Breaking News

खळबळजनक घटना.... बाप तो बापच ! सासरच्या जाचाला कंटाळलेल्या लेकीला बापाने वाजत – गाजत घरी आणलं,

खळबळजनक घटना.... बाप तो बापच ! सासरच्या जाचाला कंटाळलेल्या


लेकीला बापाने वाजत – गाजत घरी आणलं,

सध्या सोशल मिडीयावर एका बाप लेकीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या मुलीचा बाप आपल्या मुलीला वाजत गाजत

 तिच्या सासरहून माहेरी आणत आहे आणि त्याचे कारण देखील तसेच आहे बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो.

 आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो.

सासरच्या जाचाला कंटाळलेल्या लेकीला चक्क बँडबाजा वाजवत वाजत-गाजत घरी आणलंय.

रांचीमधील एका वडिलांनी सासरच्या जाचाला कंटाळलेल्या आपल्या लेकीला अशा पद्धतीनं घरी आणलं. या वडिलांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. 

त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने लोक होते. बँड वाजत आहे आणि दुसरीकडे लोक फटाके फोडून आनंद साजरा करीत आहेत.

व्हिडीओ शेअर करीत प्रेम गुप्ता यांनी लिहिलेय, “जर तुम्ही मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात करता, तर मग नंतर तिच्यासोबत होणाऱ्या चुकीच्या 

गोष्टीही सहन न करता, तिला थाटामाटात सन्मानानं घरी परत आणा. मुली या खूप मौल्यवान आहेत.

”  “ही मुलगी खूप भाग्यवान आहे. कारण- तिला तुमच्यासारखे वडील मिळाले”, अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. तर दुसऱ्या एक युजरनं “असा बाबा सर्वांना हवा”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

याबद्दलची माहिती अशी आहे कि, साक्षी गुप्ता आणि सचिन कुमार यांचा विवाह २८ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. 

सचिन झारखंड विद्युत विभागात काम करतो. लग्नानंतर काही दिवसांपासून सचिनच्या कुटुंबीयांनी साक्षीचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे.

 एवढंच नाही, तर काही दिवसांनी त्या मुलाचं दोन वेळा लग्न झाल्याचं कळलं तेव्हा ती अस्वस्थ झाली. साक्षीनं नातं वाचवण्याचा प्रयत्न केला; 

पण शेवटी तिनं यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या वडिलांनीही तिला साथ दिली.

Post a Comment

0 Comments