google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंतप्रधानांच्या हस्ते कोळा विद्यामंदिर येथे कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन संपन्न

Breaking News

पंतप्रधानांच्या हस्ते कोळा विद्यामंदिर येथे कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन संपन्न

 पंतप्रधानांच्या हस्ते कोळा विद्यामंदिर येथे कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन संपन्न


सांगोला (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण ५११ कौशल्य विकास केंद्रांचे अनावरण केले. सांगोला तालुक्यातील कोळे येथील कोळा विद्यामंदिर येथे कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन यावेळी संपन्न झाले.

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ३४ ग्रामीण जिल्ह्यांमध्ये ही केंद्र सुरु स्थापन करण्यात आली आहेत. 

या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होउ शकतील. या केंद्रात विविध प्रकारच्या कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रात किमान दोन व्यावसायिक अभ्यासक्रम असतील व सुमारे १०० तरुणांना प्रशिक्षण देण्यात येईल.

 यावेळी संस्था अध्यक्ष प्रा. पी. सी. झपके सर, माजी सभापती संभाजी आलदर, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, प्राचार्य श्रीकांत लांडगे सर, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य घोंगडे सर, अमोल गायकवाड सर, विनोद देशमुख सर,

 पर्यवेक्षक रफिक मनेरी सर यांच्यासह विद्यामंदिर परिवार मधील सर्व पर्यवेक्षक शिक्षक स्टाफ, शासकीय प्रशासकीय वर्ग, पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments