पुणे येथे कर्तुत्ववान व्यक्तींचा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
शिरभावी:- आज समाजामध्ये विविध मार्गांनी यशोशिखर गाठणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि संघर्षाची जोड असते. याशिवाय यश प्राप्ती फार कठीण आहे.
यशाची शिखरे गाठण्यापूर्वी प्रचंड परिश्रम करावे लागतात. परंतु यामध्ये सातत्य ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरस्काराच्या निमित्ताने गौरविण्यात
आलेल्या पुरस्कारार्थींचे जीवन ही अशाच संघर्षमय वाटचालीतून गेले आहे. त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करत टॅलेंट कट्टा या संस्थेकडून मा.श्री. मेघराज राजेभोसले अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, सुप्रसिद्ध अभिनेत्री आर्या घारे,
सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते मा. सुनिल गोडबोले यांच्या शुभहस्ते पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला. समाजासाठी शिक्षण, कला, आरोग्य, सामाजिक, राजकीय, उद्योग, कृषी, क्रीडा, अध्यात्म, पत्रकार, युवा, महिला या व विविध क्षेत्रात
अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांचा टॅलेंट कट्टा या संस्थेकडून इंडियन टॅलेंट अवॉर्ड या पुरस्काराने सन्मान करण्यात आला . हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 8 ऑक्टोंबर, 2023 रोजी पत्रकार भवन सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे या ठिकाणी पार पडला.
या आयोजित सन्मान सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावरती विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करून आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांना इंडियन टॅलेंट अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या निर्मळ भावनेतून टॅलेंट कट्टा ही संस्था स्थापन झालेली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करणे, त्यांचे कार्य प्रकाश झोतात आणणे,
मान्यवरांच्या कार्यांचा विशेष गौरव करून त्यांना प्रसिद्धी मिळवून देणे, हे व इतर अनेक हेतू डोळ्यासमोर ठेवून ही संस्था स्थापन करण्यात आली आहे
असे प्रतिपादन टॅलेंट कट्टा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिपक जाधव यांनी केले. यावेळी पुढे बोलताना संस्थापक अध्यक्ष श्री. दिपक जाधव म्हणाले की यश मिळवणे तितकं सोपं नाही. आज जरी यशस्वी मान्यवरांचा इंडियन टॅलेंट अवॉर्ड हा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला असला
तरी हे यशाचे शिखर गाठण्यासाठी त्यांना मोठ्या संघर्षातून जावे लागले आहे. ही संस्था चालू करण्यासाठी मी देखील खूप संघर्ष केला आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात व्यक्तीने चिकाटी, जिद्द ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे असते.
या कार्यक्रमासाठी समाजातील विविध क्षेत्रातील हिरे हेरण्याचे काम टॅलेंट कट्टा या संस्थेने केले आहे . विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या कार्यामध्ये सातत्य ठेवा सातत्यातून आपल्या कार्याला निश्चितपणे फलप्राप्ती प्राप्त होईल असे सांगत
त्यांनी सर्व पुरस्कारार्थींना त्यांच्या भावी आयुष्यासाठी व त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा पार पाडण्यासाठी टॅलेंट कट्टा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिपक जाधव व त्यांच्या संपूर्ण टीमने खूप परिश्रम घेतले .
0 Comments