google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी ८कोटी रुपये निधी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील. अल्पसंख्याक बहुल भागासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर.

Breaking News

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी ८कोटी रुपये निधी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील. अल्पसंख्याक बहुल भागासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर.

 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सांगोला विधानसभा


मतदारसंघासाठी  ८कोटी रुपये निधी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील.


अल्पसंख्याक बहुल भागासाठी  एक कोटी रुपये निधी मंजूर.

 सांगोला/ प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे  ग्रामीण भागातील रस्ते सुधारणे विविध ठिकाणी पेव्हिंग  ब्लॉक टाकून

 रस्ते तयार करणे सिमेंट काँक्रीट रस्ते करणे  विविध गावातील ८० कामांसाठी  आठ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती  आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली

 या निधीमधून ग्रामीण भागातील विविध गावातील मूलभूत नागरी सुविधा मजबूत होणार असल्याने गावे विकसित होणार आहेत  नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने या कामामुळे सोयीचे होणार असल्याने नागरिकांच्या मनामध्ये समाधानाचे वातावरण आहे

 त्याचबरोबर अल्पसंख्यांक मंत्री  अब्दुल सत्तार यांच्याकडे  मागणी केल्याप्रमाणे एक कोटी रुपये चा निधीही मंजूर झाला आहे या निधीमधून सांगोला नगरपरिषद हद्दीमधील मुस्लिम दफनभूमी येथे सुधारणा करणे 

२५लाख महूद बुद्रुक येथील पठाण वाडी येथील मस्जिद  विकसित करणे २५लाख वाकी घेरडी येथील मुस्लिम समाज सभागृह बांधणे २५ लाख जवळा गावातील ईदगाह  सुशोभीकरण करणे  करणे २५ लाख अशी कामे अल्पसंख्यांक बहुल  भागातील मंजूर झालेले आहेत

 वरील सर्व कामांच्या  निविदा प्रक्रिया पूर्ण करून  लवकरच कामे चालू करण्याच्या सूचना  आमदार शहाजी बापू पाटील यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच कामे वेळेत गुणवंतापूर्वक करण्यात याव्यात अशाही सूचना देण्यात आल्या आहेत

Post a Comment

0 Comments