google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील चार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ११ जण रिंगणात

Breaking News

सांगोल्यातील चार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ११ जण रिंगणात

 सांगोल्यातील चार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ११ जण रिंगणात 


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक व तीन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकीसाठी शेवटच्या दिवसअखेर खवासपूर, सावे,

 चिकमहुद, वाढेगाव या चार ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ११ आणि सदस्यपदाच्या ५० जागांसाठी तब्बल ११३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांचे होम ग्राउंड असलेली चिकमहूद ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश मिळाले नसल्याने या ठिकाणी प्रतिष्ठेची लढत होत आहे. 

तालुक्यातील मुदत संपलेल्या खवासपूर, सावे, चिकमहूद, वाढेगाव या चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर चिणके, ह. मंगेवाडी, मेडशिंगी या तीन ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसअखेर वाढेगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागेसाठी ३९ पैकी ११ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. एक जागा बिनविरोध झाली असून १२ जागेसाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. 

तर सरपंचपदासाठी दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. चिकमहूदसाठी १५ जागेसाठी १०६ पैकी ७० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ३६ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

 तर सरपंचपदासाठी २१ पैकी १८ जणांनी अर्ज मागे घेतल्याने तीन उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

खवासपूर ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी ४९ पैकी २६ जणांनी अर्ज मागे घेतल्याने २३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. तर सरपंचपदासाठी आठ पैकी चारजणांनी अर्ज मागे घेतल्याने चार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. 

सावे ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी ४४ पैकी २१ जणांनी अर्ज मागे घेतल्याने २३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. तर सरपंचपदासाठी १० पैकी आठजणांनी अर्ज मागे घेतल्याने दोन उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. 

चार ग्रामपंचायतींच्या ४९ जागांसाठी ११३ उमेदवार तर चार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

तसेच पोटनिवडणूक असलेल्या ह.मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. चिणके ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच मेडशिंगी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी निवडणूक सुरू असून सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

आमदार पाटलांना ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अपयश

शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांचे होमग्राउंड असलेली चिकमहूद ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश मिळाले नसल्याने या ठिकाणी प्रतिष्ठेची लढत होत आहे. या ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्यातील लक्ष लागले असून शिंदे गटाविरोधात ठाकरे गटाने शड्डू ठोकल्याने ही ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

Post a Comment

0 Comments