google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील मेथवडे गावात सर्वपक्षीय नेत्यांना येण्यास बंदी; ग्रामस्थांचा ठराव

Breaking News

सांगोला तालुक्यातील मेथवडे गावात सर्वपक्षीय नेत्यांना येण्यास बंदी; ग्रामस्थांचा ठराव

 सांगोला तालुक्यातील मेथवडे गावात सर्वपक्षीय नेत्यांना येण्यास बंदी; ग्रामस्थांचा ठराव


सांगोला (प्रतिनिधी.शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२) :- 

सांगोला तालुक्यातील मेथवडे ग्रामपंचायत मेथवडे येथील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन गरजवंत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय नेत्यांना गावात जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही

 तोपर्यंत गावात प्रवेश करण्यास बंदी घालुन गावाच्या वेशीवर तसा फलक लावण्यात आला 

असुन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शविला असून लवकरच 

गावकरी साखळी उपोषणालाबसणार असुन मराठा आरक्षणाचा प्रश्न जो पर्यंत सुटत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार आहे.

याप्रसंगी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा सभापती भाई गिरीष गंगथडे, माजी सरपंच जगदीश पाटील, रमेश पवार, परमेश्वर पवार, नवनाथ पवार, संतोष पवार, धर्मराज पवार 

सिध्देश्वर पवार, राजु खंडागळे, विलास माळी, चंद्रकांत जगदाळे, आण्णा माने दत्ताञय पवार, चंद्रकांत सुर्यवंशी, पप्पु लवटे, आण्णा पवार, किरण पवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments