google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी... जत तालुक्यातील वाळेखिंडीच्या माळावर फुलवली इस्त्राइल बाजरीची शेती : प्रा. हिप्परकरांचा नवा उपक्रम

Breaking News

मोठी बातमी... जत तालुक्यातील वाळेखिंडीच्या माळावर फुलवली इस्त्राइल बाजरीची शेती : प्रा. हिप्परकरांचा नवा उपक्रम

मोठी बातमी... जत तालुक्यातील वाळेखिंडीच्या माळावर फुलवली


इस्त्राइल बाजरीची शेती : प्रा. हिप्परकरांचा नवा उपक्रम 

जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. दुष्काळ तर तालुक्याच्या पाचवीला पुजलेला आहे. तालुका १००% अवर्षणग्रस्त तालुका ओळखला जातो. 

तालुका दुष्काळ असला तरी या भागातील लोकांचे मने दुष्काळी नसून शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रयोग तालुक्यातील शेतकरी करत असतात 

त्यातील एक भाग म्हणजे तालुक्यातील वाळेखिंडीचा माळावर प्रा. एन. के. हिप्परकर यांनी इस्त्राइल बाजरीचा नवा प्रयोग करत एक वेगळाआदर्श तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समोर ठेवत इस्त्राइल बाजरी वाळेखिंडीमध्ये पिकवली आहे.

जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळ भाग आहे व शेतीला जास्त प्रमाणात पाणी नसल्यामुळे तालुक्यातील बराच युवा वर्गाने शेतीकडे पाठ फिरवलाचे दिसत येत आहे

 परंतु वाळेखिंडी (लोणारवाडी) येथील प्रा. हिप्परकर यांनी बार्शी येथे महाविद्यालयामध्ये संख्याशास्त्राचे शिक्षक म्हणून नोकरी करत होते.

 संख्याशास्त्र विषयाचे प्राध्यापक असल्यामुळे अनेक देशाचे दौरे त्यांनी केले आहेत ज्या देशात व राज्यात गेले

 तेथील नाविण्यपूर्णनवनवीन गोष्टी जाणून घेऊन त्यावर अभ्यास करणे व अमलात आणण्याचा प्रयत्न करत असतात तसेच त्या भागातील कोणत्या पिकांना मागणी जास्तमागणी आहे

 ते पीक आपल्या भागात उत्पन्न घेता येईल का ? सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतात हा त्यांचा छंद आहे सन २०१७ रोजी सेवानिवृत्त झाले.

सुरुवातीपासूनच त्यांना शेतीचे आवड होती त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग आपल्या शेतीमध्ये राबवले आहेत.

या भागात कमी पाऊस असल्याने त्यांनी इस्माइल बाजरी या पिकावर अभ्यास केला आपल्या भागातील बाजरी पेक्षा जास्त उत्पन्न देणारे

 बाजरी हे पीक आहे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये एक एकर इखाइलची बाजरी पेरली केली. 

एक किलो बाजरीचा बियाणाणे यांनी दर पाच हजार रुपये या दराने त्यांनी एक किलो बियाणे खरेदी केली.त्या बाजरीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या बाजरी पेक्षा वेगळी ती बाजरी आहे. 

आपल्या भागातील बाजरीच्या कणसाची लांबी नऊ इंच ते एक फुटापर्यंत असते पण या बाजरीचे कणसाची लांबी तीन ते साडेतीन फूट लांबीचे असून येणारे पीक ही तीन पटीने वाढून येते म्हणून भागातील शेतकऱ्यांनी इवाइल बाजरीचे उत्पन्न घ्यावे

 या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. ही बाजरी पाहण्यासाठी तालुक्यातील व बाहेरील गावातील लोकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी रवी सोलनकर, ज्ञानेश्वर वाघमोडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments