google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरमधील चारा छावण्यांच्या देयकांचा अहवाल सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

Breaking News

सोलापूरमधील चारा छावण्यांच्या देयकांचा अहवाल सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 सोलापूरमधील चारा छावण्यांच्या देयकांचा अहवाल सादर करावा –


मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील 

सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी, त्यातील त्रुटी तपासून अहवाल सादर करावा. 

याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यांची थकित देयके देण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. 

यावेळी आमदार जयंत पाटील, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर उपस्थित होते.

मंत्री अनिल पाटील म्हणाले की, सन 2018 च्या खरीप हंगामात शासनाने दु्ष्काळ जाहीर केलेल्या भागात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. 

एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीमधील प्रलंबित देयके अदा करण्याबाबत शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात आहे. 

याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त अहवालामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरूस्त करून त्याबाबत सुनावणी घेऊन अहवाल सादर करावा. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments