google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात पार्टी ट्रस्ट आयोजित सर्वपक्षीय मित्रांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींचा मित्र मेळावा

Breaking News

सांगोल्यात पार्टी ट्रस्ट आयोजित सर्वपक्षीय मित्रांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींचा मित्र मेळावा

सांगोल्यात पार्टी ट्रस्ट आयोजित सर्वपक्षीय मित्रांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींचा मित्र मेळावा


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- पार्टी ट्रस्ट आयोजित सोशल मीडियामधील सर्वपक्षीय मित्रांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींचा मित्रमेळावा उद्या रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी रामकृष्ण गार्डन व्हिला, सांगोला- मंगळवेढा रोड, सांगोला जि. सोलापूर येथे आयोजीत करण्यात आला आहे.

पार्टी ट्रस्ट आयोजित सोशल मीडियामधील सर्वपक्षीय मित्रांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींचा मित्रमेळावा यंदा सांगोल्यात होत आहे. साहजिकच सर्वासाठी सोलापूर जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीची ओळख असणान्या शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा बेत आयोजित केला आहे.

 सोबतीला चांगले विचार, मनोरंजनाचा अमाप खजिना आणि सामाजिक भान जपणारा शेतकरी मदतनिधी/ विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान सोहळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

प्रारंभी सकाळी ९ वाजता उपस्थिती व नावनोंदणी कूपन वाटप करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता प्रास्ताविक व सर्व स्पॉन्सर्सचा सन्मानकरण्यात येणार असून सकाळी १०.३० वा. शेतकरी मदतनिधी / विद्यार्थी शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे.

पहिल्या सत्रात स. ११ ते दु. १ वाजेपर्यंत प्रविणदादा गायकवाड (प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड ), राजाभाऊ गायकवाड (डेप्युटी कमिशनर, वस्तू सेवाकर विभाग), अभयसिंह मोहिते (उपजिल्हाधिकारी ), डॉ. कृष्णा इंगोले ( इतिहास अभ्यासक, सांगोला), दत्तामामा भोसले (प्रगतशील शेतकरी, सरकोली)

 तर दुसऱ्या सत्रात दु. २ ते सायं. ४ वा. किरण माने (सिनेअभिनेता), कवी इंद्रजित घुले, माणदेशी कथाकथनकार जोतिराम फडतरे, गायक मंगेश बोरगावकर, लावणीसम्राट किरण कोरे आदी मान्यवर, कलाकार मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमस्थळी नावनोंदणी शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. व मद्यपान करुन कार्यक्रमस्थळी येऊ नये असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments