google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोला शहरात पेटोलिंग करत असताना मोबाईल चोरट्यांना अटक

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोला शहरात पेटोलिंग करत असताना मोबाईल चोरट्यांना अटक

 ब्रेकिंग न्यूज..सांगोला शहरात पेटोलिंग करत असताना मोबाईल चोरट्यांना अटक


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला  :- नाईट राऊंड दरम्यान सांगोला शहरातील चिंचोली रोडवर २ चोरट्यांना अटक करुन ५ मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची घटना चिंचोली रोड, सांगोला येथे घडली. याबाबत सांगोला पोलीस ठाण्याचे पोशि प्रेम दिवसे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ११ वाजता सांगोला पोलीस स्टेशनचे पोना पवार, चालक पोशि आडके व होमगार्ड नलवडे असे सरकारी गाडीने सांगोला शहरात पेट्रोलिंग करीत होते. 

त्यादरम्यान रात्री २.१० वाजण्याच्या सुमारास सांगोला ते चिंचोली रोड वरती गस्त करित असताना समोरुन दुचाकी मोटार सायकल वरुन तोडाला गमजा बांधुन दोन इसम येत होते.

 त्यावेळी त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबविले असता सदर दोन इसमांना त्याचे नाव गाव व गाडी बाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांचा चोरटे असल्याचा संशय आला.

यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता, पाच मोबाईल फोन, पक्कड पाना इत्यादी वस्तु मिळुन आल्या. त्यानंतर त्याना ताब्यात घेवुन सांगोला पोलीस ठाणेस घेवुन येवुन दोन्ही इसमांना विश्वासात घेतले असता त्यांनी सदरचे पाच मोबाईल फोन चोरी केली असल्याचे सांगितले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments