खळबळजनक..सोलापूर! १९ वर्षीय वृषालीचा भलताच कांड
सोलापूर (प्रतिनिधी) मणप्पुरम फायनान्स लिमिटेड ब्रॅंच हेड यांनी ३ कोटी २८ लाख १२ हजार ८९२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि घटना १७ नोव्हेंबर २०२२ पासून ते २२ सप्टेंबर २०२३ दरम्यान मणप्पुरम फायनान्स लिमिटेड लक्ष्मी मार्केट सोलापूर येथे घडली. याप्रकरणी प्रवीण बाबुराव वरवटे (वय-३०,रा.गोरटा, ता.बसवकल्याण, जि.बिदर राज्य- कर्नाटक) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून वृषाली विनीत हुंडेकरी (रा.१९,स्नेहल पार्क,जुळे सोलापूर,सध्या-वसुंधरा अपार्टमेंट,देगाव रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मणप्पुरम फायनान्स लिमिटेडचे ब्रॅंच हेड वृषाली हुंडेकरी यांनी
दि.१७ नोव्हेंबर २०२२ पासून ते २२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत एकूण ३ कोटी २८ लाख १२ हजार ८९२ रुपये किमतीचे ५ किलो ९७४ ग्रॅम सोने तारण ठेवून त्यासाठी सुमारे ८१ बनावट कर्ज प्रकरणे केली.
तसेच त्या कर्ज प्रकरणासाठी एकूण २ कोटी ३४ लाख ५२ हजार ३९६ रुपये इतकी रक्कम कर्जदारांना दिली आहे,
असे भासवून त्या रकमेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. त्यानंतर १ सप्टेंबर २०२३ ते २२ सप्टेंबर २०२३ पर्यंत या कालावधीत वृषाली हुंडेकरी यांनी बनावट कर्ज प्रकरणी तारण ठेवलेले ५ किलो ९७४ ग्रॅम सोने स्वतः अपहार करून
मणप्पुरम फायनान्स लिमिटेड कंपनीची एकूण ३ कोटी २८ लाख १२ हजार ८९२ रुपये रक्कमेची फसवणूक केलीअसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.
0 Comments