google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..शाळा बचाव! सोलापूर जिल्हाधिकारीकार्यालयावर शिक्षक संघाचा निघणार आक्रोश मोर्चा; शिक्षकांच्या एकजुटीची ताकद सरकारला दाखवणार

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..शाळा बचाव! सोलापूर जिल्हाधिकारीकार्यालयावर शिक्षक संघाचा निघणार आक्रोश मोर्चा; शिक्षकांच्या एकजुटीची ताकद सरकारला दाखवणार

 ब्रेकिंग न्यूज..


शाळा बचाव! सोलापूर जिल्हाधिकारी


कार्यालयावर शिक्षक संघाचा निघणार आक्रोश मोर्चा; शिक्षकांच्या एकजुटीची ताकद सरकारला दाखवणार 

शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण करून शाळा दत्तक देण्याच्या नावाखाली सरकारी शाळा  बंद पाडण्याचा डाव. मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांना शिकवण्याचे काम बाजुला ठेवुन वारंवार अशैक्षणिक कामे लावली जात आहेत.

नवीन शिक्षक भरती केली जात नाही. असलेल्या २००५ नंतरच्या शिक्षकांना जूनी पेन्शन दिली जात नाही. आहे तेवढया शिक्षकांकडून सर्व कामे करून घेऊनही शिक्षकाविषयी लोकप्रतिनिधी कडून वारंवार अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत.

अशी वक्तव्ये थांबवले पाहिजेत आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळून फक्त आणि फक्त शिकवु दया यासह इतर मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात (तात्या) यांच्या आदेशानुसार,

राज्याध्यक्ष अंबादास वाजे व राज्य कार्यकारी अध्यक्ष म. ज. मोरे , राज्य नपा/मनपा सरचिटणीस संजय चेळेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून

सोमवार दि. २ ऑक्टोंबर २०२३ रोजी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.

तेव्हा सदर दिवशी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने  राज्य सल्लागार मंडळाचे अध्यक्ष लहू कांबळे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष तात्या यादव , जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार

 यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य स्तरावरील व स्थानिक पातळीवरील मागण्यांकरिता पार्क चौक ते पुनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्य शासन स्तरावरील मागण्या

शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करा,

शाळा बचावासाठी सरकारी शाळा कार्पोरेट कंपन्याना न देणे, शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावी,

लोकप्रतिनिधींकडून अवमानकारक वक्तव्ये थांबवण्यात यावी, संच मान्यतेतील त्रुटी दूर करण्यात यावी , नवीन

 शिक्षक भरती पूर्वी जिल्हा अंतर्गत व अंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात यावी,

MS-CIT अट शिथिल करण्यात यावी ,सर्व थकित बिलासाठी त्वरीत अनुदान मिळावे,

जुनी पेन्शन लागू करण्यात यावी,

मुख्यालय राहणे अट रद्द व्हावी,

बदली प्रक्रिया त्रुटी दूर करावी,

नवीन शिक्षक भरती करण्यात यावी,

शिक्षकांना १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना लागु करावी,

तसेच सोलापूर जिल्हा परिषद स्थरावरील प्रलंबित असलेली केंद्र प्रमुख पदोन्नती प्रक्रिया पार पाडावी, मे नंतरच्या उर्वरित शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नती द्यावी,

मान्य टक्केवारीनुसार विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्यावी, दरवर्षी २० टक्के प्रमाणे मागील अनुशेषासह निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा,तालुका निहाय कार्यशाळा लावून शिक्षकांच्या सेवा पुस्तकाचे पडताळणी करावी.

या सर्व प्रश्नासाठी जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू-भगिनींनी अशैक्षणिक कामातून मुक्तता मिळवून इतर मागण्या मान्य करून घेण्यासाठी सुट्टीचा दिवस असला तरी एक दिवस संघासाठी, 

आपल्याच मागण्या मान्य करून घेण्यासाठी म्हणून मोर्चात सहभागी होऊन शिक्षकांच्या एकजुटीची ताकद दाखवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या  वतीने करणेत येत आहे.

Post a Comment

0 Comments