google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण अपघात.....अक्कलकोट, पंढरपूर, सांगोल्यात अपघाताच्या घटना टेम्पो, मोटारसायकल अपघात; महिलेसह तीन ठार, एक जखमी दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Breaking News

भीषण अपघात.....अक्कलकोट, पंढरपूर, सांगोल्यात अपघाताच्या घटना टेम्पो, मोटारसायकल अपघात; महिलेसह तीन ठार, एक जखमी दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

 भीषण अपघात.....अक्कलकोट, पंढरपूर, सांगोल्यात अपघाताच्या घटना टेम्पो,


मोटारसायकल अपघात; महिलेसह तीन ठार, एक जखमी  दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

सांगोला : पौर्णिमेनिमित्त देवदर्शन करून दुचाकीवरून घराकडे परतताना अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३४ वर्षीय दुचाकी चालकाचा आगीच मृत्यू झाला.

 हा अपघात शुक्रवारी रात्री ८.३०च्या सुमारास तरंगेवाडी ते घेरडी (ता. सांगोला) जाणाऱ्या रोडवरील म्हसोबाच्या मंदिराजवळ घडला. जगन्नाथ म्हाळाप्पा दोलतोडे (रा. घेरडी, ता. सांगोला) असे मृताचे नाव आहे.

जगन्नाथ दोलतोडे व त्याची पत्नी शुक्रवारी घेरही येथून पौर्णिमेनिमित दुचाकीवरून देवाला गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर पत्नी एसटीमधून घराकडे परतली. तर पती दुचाकीवरून घराकडे येत असताना तरंगेवाडी ते धेरडी रोडवर म्हसोबा मंदिराजवळ 

दुचाकीला अपघात होऊन जगन्नाथ दोलतोडे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घेरडीतील नागरिकांनी पोलिस पाटील रेखा आवताडे यांना माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी

नातेवाइकांनी सांगोला ग्रामीणतपासून त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल भानवसे करीत आहेत.

टेम्पो व मोटारसायकल अपघात;तरुण ठार

अक्कलकोट : शिरवळ (ता. अक्कलकोट) जवळ टेम्पो व मोटारसायकल अपघातामध्ये तीस वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना दि.२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली आहे. याबाबत उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

हकिकत अशी की, दि. २७सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वा चे सुमारास सागर महादेव ठाकूर (रा शिरवळ, ता. अक्कलकोट) हे मोटारसायकल नं. एमएच १३ / डीबी ३२८३ वरुन शिरवळ ते सांगवी सटवाई मंदिराकडे वागदरी ते अक्कलकोट रोडने जात होते. तेव्हा अक्कलकोट कडून येणारा टेम्पो

 नं. एमएच १३ सीयू ९४३६ यांची धडक झाली. टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोसई पंडित चव्हाण करीत आहेत. याबाबत फिर्यादी अंकिता सागर ठाकूर यांनी दिली आहे.

दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पंढरपूर शहरात वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने दुचाकीवरून चाललेल्या एका कुटुंबाला धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 

आनंद बाबूराव सोमासे (वय ४२, रा. गाताडे प्लॉट, पंढरपूर) हे त्यांच्या एमएच ४५ / एएन ३३२० या मोटारसायकलवरून पत्नी गीतांजली, मुलगा राजशेखर, मुलगी राजनंदणी हे त्यांचे महालक्ष्मी डायनिंग हॉल हॉटेल रात्री साडेनऊ वाजता 

बंद करून घराकडे निघाले होते. दरम्यान से शासकीय गोडाऊनसमोरुन व्हीआयपी रस्त्याकडे वळत असताना त्यांना एमएच १३ ए १३८६ या क्रमांकाच्या मोटारसायकलने जोरदार धडक दिली.

 या धडकेत गीतांजली यांना गंभीर जखम झाली. त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे. तर आनंद, राजशेखर, राजनंदणी यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी ओंकार सूर्यवंशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments