google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन हैद्राबाद येथे यावर्षी साजरा होणार ः प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे

Breaking News

3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन हैद्राबाद येथे यावर्षी साजरा होणार ः प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे

 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन हैद्राबाद येथे यावर्षी साजरा होणार ः प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे


सांगोला/प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा 3 ऑक्टोबर रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. या पक्षाचा 3 ऑक्टोबर रोजी 67 वा वर्धापन दिन सोहळा हैद्राबाद येथे

 केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला असून या वर्धापन सोहळ्यामध्ये देशातील 28 राज्यांचे प्रमुख पदाधिकारी व नागालँड येथील पक्षाचे दोन आमदार यांच्या उपस्थितीत 

हा सोहळा होणार असून या कार्याक्रमासाठी सांगोला तालुक्यातील पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केले आहे.

या शिबिराच्या नियोजनासाठी सांगोला तालुका कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली 30सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल जयनिला हॉल येथे संपन्न झाली. 

या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस शामसुंदर उर्फ  रवि गायकवाड उपस्थित होते. यावेळी पक्षाच्यावतीने सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. 

तसेच रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी हा उपक्रम सांगोला तालुक्यात राबविण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर गवळी, जिल्हा चिटणीस सतिश काटे, 

पश्‍चिम महाराष्ट्र नेते राजाभाऊ मागाडे, रविकांत बनसोडे मातंग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर साठे, मातंग आघाडी प.महाराष्ट्र नेते आण्णा गस्ते, मातंग आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष शंकर फळके, मातंग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर,

 मातंग आघाडी तालुकाध्यक्ष शहाजी माने, मातंग आघाडी तालुका सरचिटणीस दिपक कांबळे, वझरे ग्रा.पं.सदस्य लक्ष्मण वाघमारे, कटफळ ग्रा.पं.सदस्य सदाशिव शेळके, जुनोनी ग्रा.पं.सदस्य मोहन कांबळे,

 हंगिरगे ग्रा.पं.सदस्य अर्जुन लांडगे, सांगोला तालुका सरचिटणीस सुरज होवाळ, तालुका संघटन सचिव तथा लोटेवाडी वि.का.सेवा सोसायटी संचालक सदाशिव सावंत, युवक जिल्हा उपाध्यक्ष नवा सरतापे,

 युवक आघाडी तालुकाध्यक्ष सौदागर सावंत, कोषाध्यक्ष सखाराम लांडगे, कार्याध्यक्ष दत्ता ढोबळे, संघटन सचिव शशिकांत साबळे, सरचिटणीस दिपक व्हनकट्टे, महुद शहराध्यक्ष विशाल उर्फ पिंटू सरतापे, कैकाडी समाज नेते सुरज माने, युवक नेते संजय करडे,

 आशिष गायकवाड, तालुका प्रसिध्दी प्रमुख तेजस आढाव, तालुका संपर्क प्रमुख सुरेंद्र ढोबळे, गोतम जगधने, मार्गदर्शक गौतम चंदनशिवे, दत्ता मोरे, अक्षय मोरे, राजेंद्र नलवडे, अमित साठे, विकास काटे, तालुका उपाध्यक्ष भिमराव काटे, सागर करडे, केतन कसबे, बजरंग गायकवाड, 

दत्ता होवाळ, राजू वलेकर, हंगिरगे विकास सोसायटी व्हा.चेअरमन बंडू लांडगे, बिरा लांडगे, सागर किर्तिके, भालचंद्र मोरे, समाधान होवाळ, अतुल सावंत, अरूण चंदनशिवे, डॅशर धांडोरे, समाधान होवाळ यांच्यासह रिपब्लिक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments