google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ...सांगोला कडून पंढरपूर कडे जाणाऱ्या सर्व एसटी शालेय विद्यार्थ्यांसाठी थांबन्यात याव्यात ; अन्यथा रस्ता रोको आंदोलन..!

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ...सांगोला कडून पंढरपूर कडे जाणाऱ्या सर्व एसटी शालेय विद्यार्थ्यांसाठी थांबन्यात याव्यात ; अन्यथा रस्ता रोको आंदोलन..!

 ब्रेकिंग न्यूज ...सांगोला कडून पंढरपूर कडे जाणाऱ्या सर्व एसटी शालेय


विद्यार्थ्यांसाठी थांबन्यात याव्यात ; अन्यथा रस्ता रोको आंदोलन..!

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी: सांगोल्यातून पंढरपूर कडे जाणाऱ्या एसटी शालेय विदयार्थ्यांना थांबत नसल्याचा प्रकार चालू आहेत. विद्यार्थ्यांना एसटी थांबत नसल्यामुळे पालक वर्ग संतापला आहे.

सांगोला तालुक्यात विद्यामंदिर प्रशालेत व कॉलेज मध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी खर्डी, संगेवडी, मांजरी, बामणी गावातून येत असतात परंतु शाळा/ कॉलेज सुटल्यावर

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्याना जवळील बस स्टॉप जवळ थांबतात परंतु तेथे विद्यार्थ्यांसाठी एसटी थांबत नसल्याचे प्रकार होऊ लागले आहेत. 

शाळेतील विदयार्थ्यांना सांगोला कडून पंढरपूर कडे जाणाऱ्या एसटी मध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जात नसल्याचे प्रकार खूप दिवसापासून होत आहेत. वेळोवेळी विद्यामंदिर प्रशालेत विद्यार्थ्यांनी, पालकांनी तक्रारी केल्या 

तसेच सांगोला आगराकडेही तक्रारी करूनही एसटी मध्ये चालक व वाहक विद्यार्थ्यांना घेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यावर घरी जाण्यासाठी आणि शाळेला येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.

पंढरपूर कडे जाणाऱ्या सर्व एसटी विद्यार्थ्यांना थांबन्यात याव्यात अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments