google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना....रागात जावयानं उचललं मोठं पाऊल, सासऱ्याचं घर पेटवलं आणि….

Breaking News

खळबळजनक घटना....रागात जावयानं उचललं मोठं पाऊल, सासऱ्याचं घर पेटवलं आणि….

 खळबळजनक घटना....रागात जावयानं उचललं मोठं पाऊल,


सासऱ्याचं घर पेटवलं आणि….

रागात लोक कधी काय करतील याचा अंदाजही लावू शकत नाही. अनेकदा लोक रागाच टोकाचं पाऊल उचलतात. अशा वादाच्या घटना कायमच समोर येत असतात. 

अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये रागात जावयानं चक्क सासरऱ्यांचं घरच पेटवलं. ही घटना समोर आली असून यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

जावयानं सासऱ्याचं घर जाळल्याची घटना गोंदियामधून समोर आलीय. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ग्राम डवकी गावात जावयानेच आपल्या सासरच्या घराला आग लावली वेळेवर आग विझविण्यात आली मात्र या आगीत मोटारसायकल जळाली.

डवकी या गावात राहणारे शंकर राऊत व परिवारातील सदस्य हे रात्री झोपी गेले असतांना रात्री 12 वाजता दरम्यान घराबाहेर अचानक स्पोट झाल्याचा आवाज आल. 

आवाज येताच शंकर राऊत यांनी घराबाहेर येऊन पाहिलं तर समोर ठेवलेल्या दोन मोटरसायकल आणि घराच्या समोरील छतास आग लागली होती. त्यांनी आरडा-ओरडा करताच परिसरातील लोक जमा झाले. नागरिकांनी आग विजवायला मदत केली. 

आग कोणी लावली याचा शोध घेत असताना त्यांना शंकर राऊत यांचे जावई नितेश मधुकर शहारे हा बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आलं. लोकांना पाहताच त्यांनी तिथून पळ काढला.

Post a Comment

0 Comments