google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संपूर्ण सोलापूर दुष्काळाच्या दुष्टचक्रात!

Breaking News

संपूर्ण सोलापूर दुष्काळाच्या दुष्टचक्रात!

 संपूर्ण सोलापूर दुष्काळाच्या दुष्टचक्रात!


सोलापूर जिल्ह्यातील ९१ महसूल मंडळांपैकी ८१ मंडळांमध्ये १ जून ते ३१ ऑगस्ट या तीन महिन्यात तब्बल ६० ते ८० दिवस पाऊस पडलेला नाही. पंढरपूर, सांगोला, माळशिरस,

 मंगळवेढा या चार तालुक्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे.अक्षरश: बळीराजाच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी पिके माना टाकत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाच दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.

 सोलापूर शहर व जिल्ह्याची भिस्त उजनीवर अवलंबून आहे. पण, पावसाअभावी उजनी धरण सध्या १६ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात एकरुख, हिंगणी, मांगी, 

आष्टी, जवळगाव, बोरी, पिंपळगाव ढाळे या मध्यम प्रकल्पांमध्येही पाणी नाही. पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीपात पेरलेली मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका, बाजरी, सुर्यफूल या पिकांना फुले सुद्धा आली नाहीत.

Post a Comment

0 Comments