google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. मुंबईतून 'इंडिया'ने फुंकलं रणशिंग; समन्वय समितीची घोषणा, शरद पवारांसह या १३ नेत्यांचा समावेश

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. मुंबईतून 'इंडिया'ने फुंकलं रणशिंग; समन्वय समितीची घोषणा, शरद पवारांसह या १३ नेत्यांचा समावेश

ब्रेकिंग न्यूज.. मुंबईतून 'इंडिया'ने फुंकलं रणशिंग;


समन्वय समितीची घोषणा, शरद पवारांसह या १३ नेत्यांचा समावेश

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारला आव्हान देत एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला पराभूत करण्यासाठी काय रणनीती आखली जावी, याबाबत चर्चा झाली. तसंच जागावाटप, अजेंडा आणि निवडणूक प्रचार रॅलीबाबतचे काही महत्त्वपूर्ण ठरावही मंजूर करण्यात आले. 

इंडिया आघाडीकडून समन्वय समिती, निवडणूक प्रचार समिती, मीडिया समिती, सोशल मीडिया समिती तसेच संशोधन समितीची स्थापना करण्यात आली आहे.

 समन्वय समितीमध्ये कोणाचा समावेश?

१. के. सी वेणुगोपाल

२. शरद पवार

३. हेमंत सोरेन

४. संजय राऊत

५. तेजस्वी यादव

६. अभिषेक बॅनर्जी

७. राघव चढ्ढा

८. जावेद अली खान

९. लल्लन सिंह

१०. डी राजा

११. उमर अब्दुल्ला

१२. मेहबुबा मुफ्ती

१३. टी. आर. बालू

दरम्यान, निवडणूक प्रचार समितीमध्ये विविध पक्षांच्या एकूण १९ नेत्यांचा, तसेच मीडिया समितीतस १९ नेत्यांचा, सोशल मीडिया समितीत १२ नेत्यांचा, तसेच संशोधन समितीत ११ नेत्यांचा समावेश असणार आहे.

Post a Comment

0 Comments