google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ...प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्रीच्या मृत्यूने खळबळ

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ...प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्रीच्या मृत्यूने खळबळ

ब्रेकिंग न्यूज ...प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्रीच्या मृत्यूने खळबळ


अलीकडे दक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ वाढत आहे. दक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांची भूमिका रसिकांना आवडत आहे. 

मात्र दक्षिणेतील सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री अपर्णा नायर हिचा ३१ व्या वर्षी मृत्यू झाला.

 तिच्या घरातच अपर्णा मृतावस्थेत आढळून आली. काल संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. 

दरम्यान, मृत्यूपूर्वी अपर्णा सोशल मीडियावर सक्रिय होती. तिने काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले होते. 

तिरुवनंतपुरम येथील अपार्टमेंटमध्ये अपर्णाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. काल संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली. 

त्यावेळी तिची आई आणि बहीण घरात होती. करमना पोलिसांनी अपर्णाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

पोलिसांनी कुटुंबीय आणि नातेवाइकांचा जबाब नोंदवला आहे. मृत्यूच्या काही तास आधीच सोशल मीडिया अकाउंटवरून तिने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. 

अभिनेत्री अपर्णाने चंदन माझा, आत्मसखी, मैथिली विंदुम वरुम आणि देवस्पर्शम यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले. 

तसेच काही चित्रपटांमध्येही तिच्या खास भूमिका होत्या. याशिवाय मल्लू सिंह, थट्टाथिन मरायथु, जोशीज रन बेबी रन यांसारख्या चित्रपटांतही तिने भूमिका केल्या होत्या.

Post a Comment

0 Comments