google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यात ढगफुटी ?

Breaking News

ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यात ढगफुटी ?

ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यात ढगफुटी ?


यंदा राज्यात दुष्काळ पडणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूरसह अन्य भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाअभावी पिके करपून जात आहेत. दरम्यान या गंभीर परिस्थितीबाबत शिंदे सरकार गांभीर्य नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

 सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पावसाने हुलकावणी दिली आहे. दरम्यान आज पहाटे पुण्यात मुसळधार पाऊस पडल्याची बातमी समोर येत आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस पडला आहे. 

मंगळवेढा ते बोराळे या तीन किलोमीटर अंतरावर मुसळधार पाऊस पडला आहे. पावसाने केलेल्या या तुफान बॅटिंगमुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पडणार का अशी चर्चा असताना मंगळवेढा तालुक्यात पडलेल्या या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments