google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ...सांगोला तालुक्यातील घटना एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने केला तरुणीचा खून;

Breaking News

खळबळजनक ...सांगोला तालुक्यातील घटना एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने केला तरुणीचा खून;

खळबळजनक ...सांगोला तालुक्यातील घटना  एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने केला तरुणीचा खून; 



(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)

सांगोला :  एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने कोणत्या तरी धारदार हत्याराने डोक्यात, गळ्यावर, पाठीवर, मानेवर गंभीर वार करून महाविद्यालयीन तरुणीचा निर्घुण खून केला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा ईराचीवाडी (कोळा) ता. सांगोला येथील मृताच्या घरासमोरच घडली.

ऋतुजा दादासाहेब मदने -१८ रा. हिराचीवाडी ( कोळा ) ता. सांगोला असे तरुणीचे नाव आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने केला तरुणीचा खून; सांगोला तालुक्यातील घटना

दरम्यान, ऋतुजा दादासाहेब मदने -१८ रा. हिराचीवाडी ( कोळा ) ता. सांगोला असे तरुणीचे नाव आहे. मुलीचे मामा पांडुरंग दाजीराम सरगर रा कोळा यांनी संशयित सचिन मारुती  गडदे (रा.गौडवाडी, ता सांगोला) याच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी भोसले, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात,

 पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांच्या खुनाच्या घटनेनंतर महिन्याभरातच महाविद्यालयीन तरुणीचा खून झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments