google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली ; जावयाने सासुरवाडीत घरात घुसून धारधार शस्त्राने केला हल्ला...!

Breaking News

खळबळजनक घटना...तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली ; जावयाने सासुरवाडीत घरात घुसून धारधार शस्त्राने केला हल्ला...!

 खळबळजनक घटना...तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली ;


जावयाने सासुरवाडीत घरात घुसून धारधार शस्त्राने केला हल्ला...!

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील सावळे विहीर या ठिकाणी जुन्या असणाऱ्या कौटुंबिक वादातून जावयाने सासरवाडीत राहत असलेल्या पत्नीसह इतर पाच जणांवर चाकूने हल्ला केला. 

या हल्ल्यामध्ये पत्नी, मेहुणा, आजसासू यांचा जागीच मृत्यू झाला असून सासू, सासरे आणि मेहुणी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच असणाऱ्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.जावयाविरोधात तक्रार दिली 

असल्यामुळे नाशिकरोड पोलिसांनी आरोपी सुरेश विलास निकम आणि रोशन कैलास निकम यांना अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या मदतीने घटना घडल्यानंतर पाच तासात अटक केली आहे. 

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शिर्डीजवळ सावळे विहीर इथे गायकवाड कुटुंब राहते. गायकवाड यांचे जावई सुरेश विलास निकम आणि त्यांचे नातेवाईक रोशन कैलास निकम (राहणार संगमनेर खुर्द, संगमनेर) हे दोघेजण रात्री दहा वाजेच्या सुमारास सावळे विहीर

 येथील सासुरवाडी येथे आले. घराचा दरवाजा उघडताच या दोघांनी घरातील सहा नातेवाईकांवर चाकूने त्यांना काही समजायच्या आतच जोरदार हल्ला केला. त्यामुळे या हल्ल्यात सुरेश निकमची पत्नी वर्षा निकम, मेहुणा रोहित गायकवाड आणि आजी सासू हिराबाई

 गायकवाड यांचा जागेवरच मृत्यू झाला तर सासरे चांगदेव गायकवाड, सासू संगीता गायकवाड आणि मेहुणी योगिता जाधव हे तिघेजण गंभीर जखमी झाले. हल्ला केल्यानंतर दोन्हीही आरोपी नाशिकच्या दिशेने मोटरसायकलवरून पसार झाले होते.

 दरम्यान, नगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपींचे लोकेशन मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शेळके, पोलिस उपनिरीक्षक रामदास विंचू यांना याबाबतची माहिती दिली. नाशिक रोड पोलिसांनी तातडीने पावले उचलत नाशिक-पुणे रोड वरील शिंदे 

गाव टोल नाक्याजवळ सापळा रचून मोटारसायकल वरून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या आरोपी सुरेश निकम आणि रोशन निकम या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांनी हल्ला केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पोलिस

 उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह नाशिक रोड येथे जाऊन, दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांवर हल्ला आणि त्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याने शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Post a Comment

0 Comments