google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना..आई माझा खून का केलास?, आईला मुलाचा प्रश्न आणि…

Breaking News

धक्कादायक घटना..आई माझा खून का केलास?, आईला मुलाचा प्रश्न आणि…

 धक्कादायक घटना..आई माझा खून का केलास?, आईला मुलाचा प्रश्न आणि…


 आईला पृथ्वीवरील देव बोलले जाते. पण आजकाल काही अशी उदाहरणे समोर येत आहेत. त्यात आईच्या नावला कलंक लागण्यासारखी कृत्य समोर येत आहेत.

 असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर जिल्ह्यात समोर आली आहे. आईने आपल्याच मुलाचा खून केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सनी उर्फ जतिन राठोड असे मृत बालकाचे नाव आहे. तर ज्योती राठोड असे आरोपी आईचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील

 ग्वाल्हेर जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल ध्यान सिंह यांची पत्नी ज्योति राठोड हिचे उदय इंदोलिया याच्याशी अनैतिक संबंध होते. अनेकवेळा ते लपूनछपून एकमेकांना भेटत रहायचे.

 पण घटनेच्या काहीदिवस आधी तीन वर्षाच्या जतीनने आपल्या आईला प्रियकराच्या मिठ्ठीत नको त्या अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे दोघेही साशंक झाले. 

जर मुलाने आपले प्रेम संबंध पतीला सांगितले तर आपले काही खरे नाही अशी चिंता तिला सतावू लागली.

 त्यामुळे दोघांनी मिळून पोटच्या मुलाचा खून करण्याचा कट रचला. दोघांनी २८ एप्रिल रोजी आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला घराच्या छतावरून खाली फेकून त्याची हत्या केली. पण इतरांना हा अपघात असल्याचे पटवून देण्यात ते यशस्वी ठरले. 

पण काही दिवसानंतर तिचा मुलगा सतत तिच्या स्वप्नात येऊन आपला खून का केला? असा प्रश्न विचारत होता, त्यामुळे आपण खुप तणावात होतो. 

या स्वप्नामुळे आपण झोपूही शकत नव्हतो, त्यामुळे आपण गुन्ह्याची कबुली दिली. असे ज्योतीने सांगितले आहे.

ज्योतिने स्वत:च आपल्या पापची कबुली पतीसमोर दिली. पतीने त्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. 

त्यानंतर हा पुरावा पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी ज्योती राठोड व तिचा प्रियकर उदय इंदोलिया यांना अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments