google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण अपघात.. नजर हटी दुर्घटना घटी ! एकाच कुटुंबातील ६ जण ठार

Breaking News

भीषण अपघात.. नजर हटी दुर्घटना घटी ! एकाच कुटुंबातील ६ जण ठार

 भीषण अपघात.. नजर हटी दुर्घटना घटी ! एकाच कुटुंबातील ६ जण ठार


सोलापूरसह अन्य भागात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कित्येक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेषतः रात्रीच्या अपघातात मोठी वाढ झाली आहे. 

नागरिकांनी रात्रीचा प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

नजर हटी दुर्घटना घटी, अशी एक म्हण आहे. असाच काहीसा प्रकार तामिळनाडू राज्यात घडला आहे. तामिळनाडूत भीषण अपघाताची घटना घडली आली आहे. तामिळनाडू सेलममध्ये अंगावर काटा आणणारा अपघात झाला आहे. 

कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भयंकर धडकेत एकाच कुटूंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तामिळनाडूतील येंगूर येथील एक कुटुंब गाडीतून पेरुनथुराईला त्यांच्या मुलीच्या घरी निघाले होते. 

सालेम-कोइम्बतूर राष्ट्रीय महामार्गावर कौंदनूर रोड परिसरात संकगिरीच्या पुढे जात असताना त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडकली. ही घटना काल पहाटे चारच्या सुमारास घडली.

 या भीषण धडकेत गाडीतील दहापैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका सहा वर्षाच्या लहान मुलीचाही समावेश आहे. दरम्यान ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. 

या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या ट्रकवर पाठीमागून सुसाट असलेली कार जोरात आदळल्याचे दिसत आहे. 

पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. चालकाला झोप लागल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments