google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...नाकाला चिमटा लावून आईनेच केली पोटच्या गोळ्याची हत्या

Breaking News

खळबळजनक घटना...नाकाला चिमटा लावून आईनेच केली पोटच्या गोळ्याची हत्या

खळबळजनक घटना...नाकाला चिमटा लावून आईनेच केली पोटच्या गोळ्याची हत्या


अकोला शहरातील बलोदे लेआऊटमध्ये एका आईनेच आपल्या 5 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण घडकीस आले आहे. किशोरी रवी आमले असे या 5 वर्षीय मुलीचे नाव असून विजया आमले असे मारेकरी आईचे नाव आहे.

सुरुवातीला मारेकरी आईने नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव केला होता. मात्र वैद्यकीय अहवालात या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी आईवर गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली आहे. परंतु आईनेच मुलीचा काटा काढल्यामुळे या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे.

सर्वात प्रथम मारेकरी आईने आपली मुलगी नाकाला चिमटा लावून झोपली असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सर्वांना सांगितले होते. परंतु मुलीच्या वडिलांचा पत्नीवर संशय असल्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती.

 या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली. ज्यामध्ये आढळून आले की मुलीची हत्या करण्यात आली आहे.

 तसेच मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या काही खुणा आढळणाऱ्यामुळे हे स्पष्ट झाले की तिचा खूनच झाला आहे. यानंतर खदान पोलिसांनी मारेकरी आईचा विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच तिला अटक करण्यात आली आहे. 

मुलीच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होते. तिने घटस्फोट देखील मागितला होता. परंतु घटस्फोट न दिल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

Post a Comment

0 Comments