google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना...भारतीय सैन्यातील जवानाने 8 महिन्याच्या गरोदर पत्नी व मुलीची केली हत्या

Breaking News

धक्कादायक घटना...भारतीय सैन्यातील जवानाने 8 महिन्याच्या गरोदर पत्नी व मुलीची केली हत्या

 धक्कादायक घटना...भारतीय सैन्यातील जवानाने 8 महिन्याच्या गरोदर पत्नी व मुलीची केली हत्या


नांदेड - जिल्ह्यातील बोरी तालुका कंधार येथे सैन्यात कर्तव्यावर असणाऱ्या जवानाने आपल्या 8 महिन्याच्या गरोदर पत्नीसहित 4 वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास घडली.

पत्नी व मुलीची हत्या केल्यावर आरोपी यांनी पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केले.

वर्ष 2019 मध्ये भारतीय सैन्य दलात राजस्थान राज्यात कार्यरत असणाऱ्या एकनाथ जायभाये यांचा विवाह भाग्यश्री सोबत झाला होता.

त्यानंतर भाग्यश्री ने गोडस मुलीला जन्म दिला मात्र आपल्याला मुलगा का झाला नाही यासाठी एकनाथ भाग्यश्री चा नेहमी छळ करायचा, मला मुलगा हवा मुलगी नको अशी संकुचित मानसिकता एकनाथ ची होती.

बुधवारी 13 सप्टेंबरला सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास पत्नी भाग्यश्री व 4 वर्षीय मुलगी सरस्वती चा गळा आवळून एकनाथ ने खून केला, एकनाथ हा सुट्टीवर आला होता.

दोघांना ठार केल्यावर एकनाथ ने माळा कोळी पोलीस स्टेशनमध्ये हजर होत पोलिसांना घटनेची माहिती दिली.पोलिसांनी आरोपी एकनाथ ला अटक करीत त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, मुलाच्या हौसापायी 8 महिन्याची गरोदर असलेल्या भाग्यश्री व तिच्या पोटातील बाळाचा खून करण्यात आला हे दुर्दैव.

Post a Comment

0 Comments