माढा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची सांगोला येथे बैठक-
तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे.
सांगोला (तालुका प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)- माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
या पक्षाची प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक सांगोला येथे आयोजित केले असल्याची माहिती तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे यांनी दिले आहे.
सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे, कैलास चव्हाण सांगोला विधानसभा संपर्कप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून
सांगोला मतदार संघातील "होऊ दे चर्चा" या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक राहुल चव्हाण पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी व कार्यकर्त्यांनी सांगोला शहरातील सदानंद हॉटेल, मिरज रोड येथे
शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी ठीक 4 वाजता सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब याने केले आहे.
0 Comments