बापरे... कोल्ड़ ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार
कोथरूड पोलिसांनी ठोकल्या बेड्या : जीवे मारण्याचीही दिली धमकी पुणे, दि. 13 ः कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन ४० वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या एकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.
सचिन यशवंत शिंदे (वय-४३, रा. एनडीए रोड, शिवने) असे अटक केली असून, जातीवाचक शिव्या दिल्याने ऍस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ८ मे २०२३ आणि २० जून २०२३ रोजी घडली.
पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला आणि आरोपी हे ओळखीचे आहे. आरोपी सचिन शिंदेने पीडित महिलेला वारजे येथे नेऊन पिण्यासाठी स्प्राईट हे कोल्ड ड्रिंक दिले. यानंतर महिलेला गरगरल्यासारखे झाले.
यावेळी आरोपीने संमतीशिवाय शरीर संबंध ठेऊन त्याचे फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला.
तसेच पीडित महिला या दुचाकी चालवायला शिकत असतांना शिवीगाळ केली होती. यानंतर तक्ररारदार महिनेने चौक जाऊन तक्रार दाखल केली
याच राग धरून आरोपी शिंदेने जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली आहे. शिंदेला कोथरूड पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता १५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त भीमराव टेळे करत आहेत.
0 Comments