google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हिंदु जनजागृती समितीची स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! सांगोला येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर

Breaking News

हिंदु जनजागृती समितीची स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! सांगोला येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीची स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !स्वातंत्र्यदिनाच्या


निमित्ताने  राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! सांगोला येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर 

सांगोला - राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचर्‍यात किंवा गटारात पडलेले आढळतात.

 प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते. तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी,

 या मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन तहसील कार्यालय येथे  महसूल नायब तहसीलदार गजानन बेले, पोलीस प्रशासनाच्या वतीने ठाणे अंमलदार राजू चौगुले व गटशिक्षणाधिकारी कार्यालयात विस्तार अधिकारी सुयोग नवले यांनी स्वीकारले. 

या प्रसंगी डॉक्टर मानस कमलापूरकर, विकास गावडे, गणपत पटेल, संतोष पाटणे सर उपस्थित होते. 

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या

1. शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी. 

2. जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी.

3. सर्वच शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत.

                                                   आपला विश्‍वासू,

     श्री. राजन बुणगे, हिंदु जनजागृती समितीकरिता (संपर्क क्रमांक : 9762721304)

Post a Comment

0 Comments