google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला -महूदच्या तलाठ्यास शिवीगाळ व दमदाटी करत मोठा गोंधळ तिघांचा तलाठी कार्यालयात धुडगूस

Breaking News

सांगोला -महूदच्या तलाठ्यास शिवीगाळ व दमदाटी करत मोठा गोंधळ तिघांचा तलाठी कार्यालयात धुडगूस

 सांगोला -महूदच्या तलाठ्यास शिवीगाळ व दमदाटी करत मोठा गोंधळ तिघांचा तलाठी कार्यालयात धुडगूस


सांगोला : (समता नगरी न्यूज नेटवर्क सांगोला)

बाळू साठ्याचा पंचनामा का केला असे म्हणत येथील तिघांनी तलाठी कार्यालयात जाऊन महूदच्या तलाठ्यास शिवीगाळ व दमदाटी करत मोठा गोंधळ घातला. तसेच वरिष्ठ कार्यालयास सादर करावयाचा पंचनामा अहवालही फाडला. या तिघांवर महूदच्या तलाठ्यांनी सांगोला पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

येथील गावकामगार तलाठी गणेश बाळासाहेब भुजबळ यांनी सांगोला पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (ता. ८) वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार मी महूद अंतर्गत असलेल्या लवटे मळा येथील अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन करून साठा केलेल्या ठिकाणाचा पंचनामा करण्यास गेलो होतो.

 सोबत पोलिसपाटील प्रभाकर कांबळे, कोतवाल शैलेंद्र सरतापे हे होते. पंचनामा करून सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास महूद येथील तलाठी कार्यालयात बसून आम्ही आमचे कामकाज करीत बसलो होते.

 यावेळी म्हाकू सदाशिव पाटील लवटे (रा. लवटेवस्ती, महूद) महूद) हा कार्यालयामध्ये आला. तू माझ्या शेतात येऊन पंचनामा करणारा कोण आहेस? तू माझ्या शेतातील बाळू साठा केलेल्या ठिकाणचा पंचनामा का केला? तुला मस्ती आली आहे का?

 तू येथे नोकरी कसा करतो हेच मी बघतो', असे म्हणत हातातील तहसीलदार यांना सादर करावयाचा रिपोर्ट फाडून तेथून निघून गेला. थोड्या वेळाने पुन्हा म्हा लवटे-पाटील त्याचा पुतण्या विकास सुनील लवटे-पाटील व तानाजी सुनील लवटे-पाटील हे तलाठी कार्यालयात आले. त्यांनी वाळूचा साठा आम्हीच केला आहे, 

असे सांगत तू पंचनामा का केला, असे म्हणत दमदाटी व शिवीगाळ केली. शिवाय काम करत असलेला लॅपटॉप हातातून घेऊन बंद करून परत खाली ठेवला तर विकास लवटे व तानाजी लवटे यांनी तू येथे कसा काय काम करतो, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.

Post a Comment

0 Comments