स्व.डॉ. भाई गणपतराव देशमुख यांचा आदर्श घेणे हे त्यांच्या जयंतीनिमित्त उचित ठरेल
आदर्श व्यक्तिमत्व कसे असावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. भाई गणपतरावजी देशमुख – डॉ.अनिकेत देशमुख
सांगोला( प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
स्व. डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी उपस्थित
विद्यार्थी व सांगोला तालुका व परिसरातील आबासाहेब प्रेमी युवक व ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करत असताना
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉ. अनिकेत देशमुख असे म्हणाले
की, आपणा सर्वांना एक आदर्श नागरिक बनायचे असेल, तर इतर कोणाचा आदर्श घेण्यापेक्षा,
ज्यांनी सांगोला तालुक्यातील जनतेला समानतेची वागणूक दिली, सांगोल तालुक्यातील शेतकरी कष्टकरी दिनदलित सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडून त्यांना न्याय देण्याचे काम केले.
तसेच आदर्श समाज निर्मितीचा विचार व दिशा द्यायचे असेल तर सर्व समाज उच्चशिक्षित व्हावा या उद्देशाने सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोलाची स्थापना करणारे,
तुमच्या आमच्या सर्वांचे दैवत स्व.डॉ. भाई गणपतराव देशमुख यांचा आदर्श घेणे हे त्यांच्या जयंतीनिमित्त उचित ठरेल असे माझ्यासारख्याला वाटते. त्यांच्या विचारांचा
वारसा या नवीन युवा पिढीसाठी निश्चितच एक आदर्श ठरला आहे.आज स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त 8, 9 व 10 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या
विविध स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले. 1969 साली सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या शिक्षण संस्थेची स्थापना केली.या वेल रुपी शिक्षण संस्थेचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्याचे दिसते.एवढेच नव्हे तर सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थी संख्या कमी असायची ,
पण आज या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वाट पाहावी लागते,याचे कारण म्हणजे आबासाहेबांच्या विचारधारेनुसार या संस्थेमध्ये शेतकरी, कष्टकरी, दिन-दलित,
सर्वसामान्यांच्या मुलांना अल्प फी मध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देऊन गुणवत्ता वाढीवरती भर दिला जातो.या शिक्षण संस्थेमध्ये इथून पुढेही आम्ही सर्वजण आबासाहेबांच्या विचारधारेवरती वाटचाल करणार आहोत असे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांनी स्व. आबासाहेबांच्या समवेत आलेले अनुभव संस्थेच्या स्थापनेपासून व समाजकार्याच्या सुरुवातीपासूनचे आलेले अनुभव वेगवेगळे दाखले देऊन स्पष्ट केले.
"हर घर डॉ. भाई गणपतरावजी देशमुख” याविषयी सांगताना ते असे म्हणाले की, या सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावामधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरामध्ये आबासाहेबांचे फोटो लावून त्यांना दैवत मानत होते हे सांगितले.
या शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आबासाहेबांच्या विचार आपल्या जीवनामध्ये उतरवून एक आदर्श समाज निर्मिती करण्यामध्ये सामील होऊन सहकार्य केले पाहिजे,असे सांगितले.
या तीन दिवसांमध्ये ज्या विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केले यामध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉक्टर गणपतराव देशमुख सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी,इंजिनीयर मधुकर कांबळे,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य हेमंत आदलिंगे सर, डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुलानी,
संस्था सदस्य दीपक खटकाळे सर,जयंत जानकर सर,उपमुख्याध्यापक नामदेव कोळेकर सर,उपप्राचार्य केशव माने सर, पर्यवेक्षक संजय शिंगाडे सर,माध्यमिक विभाग सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले मॅडम,सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सदस्य डॉक्टर अशोक शिंदे सर यांनी सूत्रसंचालन संतोष राजगुरू सर, जयश्री पाटील मॅडम व माधुरी जाधव मॅडम यांनी तर आभार जूनियर विभाग सांस्कृतिक प्रमुख मिलिंद पवार सर यांनी केले.



0 Comments