google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना... १२ वर्षीय मुलगा सारखा उलट उत्तरे द्यायचा; पित्याला आला राग, संतापातून घडलं धक्कादायक कृत्य

Breaking News

खळबळजनक घटना... १२ वर्षीय मुलगा सारखा उलट उत्तरे द्यायचा; पित्याला आला राग, संतापातून घडलं धक्कादायक कृत्य

खळबळजनक घटना... १२ वर्षीय मुलगा सारखा उलट उत्तरे द्यायचा;


पित्याला आला राग, संतापातून घडलं धक्कादायक कृत्य

भडगाव तालुक्यातील शिवणी येथे शनिवारी सकाळी पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना २७ जुलै रोजी घडली होती. 

जन्मदात्या बापानेच १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास आत्महत्या केल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. संजय साहेबराव चव्हाण (४८) आणि कौशिक संजय चव्हाण (१२) अशी मयत पिता-पुत्राची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी असलेले संजय साहेबराव चव्हाण हे त्यांच्या पत्नीला भाऊ नसल्याने सासुरवाडीला शिवणी येथे स्थायिक झाले आहेत. पत्नी साधनाबाई आणि दोन मुले असा संजय चव्हाण यांचा परिवार आहे. 

संजय चव्हाण यांचा मोठा मुलगा औषधशास्त्राचे शिक्षण घेऊन इंदोर येथे नोकरी करतो. तो अविवाहीत आहे. तर लहान कौशीक ऊर्फ समर्थ हा इयत्ता सहावीत शिकत होता. २७ जुलै रोजी संजय चव्हाण यांनी शेत्तात काम आहे सांगून त्यांच्यासोबत मुलाला शेतात नेल.

पत्नी साधनाबाई यांना सुद्धा चव्हाण यांनी नेहमीप्रमाणे शेतावर येण्यास सांगितले. कौशिक आणि संजय चव्हाण हे बापलेक शेतात पुढे निघाले. तर एका आजीबाईंशी गप्पा मारण्यात वेळ गेल्यामुळे साधनाबाई यांना शेतात जाण्यास उशीर झाला. आजीबाई निघून गेल्यानंतर साधनाबाई शेतात पोहोचल्या, 

तर त्यांना शेतात निंबाच्या झाडाला पती गळफास घेतलेल्या अवस्थेत तर मुलगा शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या खाटेच्या बंगळीवर निपचित पडलेला दिसला. याबाबत भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी आता पोलीस चौकशीत साक्षीदार यांच्या जबाबावरून धक्कादायक माहिती समोर आली आहे.


कौशिक हा घरातून पैसे घेत असल्याने आणि सारखा उलट उत्तरे देत असल्याने त्याचा राग वडील संजय यांना आला होता. त्यामुळे संजय यांनी कौशिक याला शेतात नेले. त्याठिकाणी रागातून त्याचा गळा दाबून त्याला जीवे ठार मारले. यानंतर स्वतः देखील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्या फिर्यादीवरून मयत बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत. या या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments