पालकांनो आता तुम्ही सावध राहा 18 पेक्षा खालील मुलांनी गुन्हा केल्यास,
वडीलांनी मुलांची पाठराखण केल्यास आत्ता थेट वडिलांनवरच होणार कारवाई..
पिंपरी चिंचवड भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय राजेंद्र निकाळजे यांची गुन्हेगारांना आळा बसवण्यासाठी
नवीन संकल्पना पालकांनो आता तुम्ही सावध राहा कारण तुमचा पाल्य जर गुन्हेगारी क्षेत्रात असेल तर आत्ताच त्याला आवरा नाहीतर
पालकांवरच होणार आता कारवाई अल्पवयीन मुले सध्या गुन्हेगारी क्षेत्रात जास्त पाहायला मिळतात त्याचा अनुषंगाने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय राजेंद्र निकाळजे यांनी या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी
आता थेट पालकांवरच कारवाई करण्यास सुरुवात केली भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी दोन टोळीच्या वादातून एका वरती वार करण्यात आले होते त्यानंतर त्याच घटनेतील आरोपींनी जय गणेश साम्राज्य चौकातील अमृततुल्य चहा च्या दुकानात येऊन धुडगूस घातला होता
तसेच या परिसरात दुचाकी गाड्या उभा केल्या होत्या या गाड्यावर देखील आरोपींनी हल्ला चढवला यामध्ये एका गाडीचे नुकसान झाले आहे. या सर्व प्रकरणानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
गुन्हा नोंद झाल्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस आरोपीच्या शोधात होते त्यावेळेस सहापैकी चार विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
तसेच या गुन्ह्यामध्ये असणारे दोन विधी संघर्षित बालकांवर मागील 302 मध्ये गुन्ह्यांची नोंद आहे त्याच अनुषंगाने पोलिसांनी यांच्या राहत्या घरी तपास केला असता दोन तलवारी तीन कोयते एक चापर असा ऐवज पोलिसांना मिळून आला आहे .
भोसरी एमआयडीसी चे पोलीस वरिष्ठ पीआय राजेंद्र निकाळजे यांनी या गुन्ह्यामध्ये या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी या विधी संघर्षित बालकाच्या वडिलांना घरात विनापरवाना हत्यारे बाळगल्याप्रकरणी
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी विधी संघर्षित बालकाच्या वडिलांना ताब्यात घेण्यात घेतले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या न्यूज चॅनलच्या
माध्यमातून गुन्हेगारीतल्या पाल्यांच्या वडिलांना सांगू शकतो की आपण पाल्याला वेळीतच आवरा नाहीतर आत्ता भोसरी एमआयडीसी पोलीस पाल्याच्या वडिलांवरच कारवाई करणर आहे


0 Comments