'आठवणीतील' भाई गणपतराव देशमुख स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळा
रविवार दि.२०/०८/२०२३ प्रकाशक भाई जगन्नाथराव लिगाडे (तात्या) चॉरिटेबल ट्रस्ट अकोला (वा.) प्रा. नानासाहेब लिगाडे
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
सांगोला:- माझ्या घरातील सर्व सदस्य शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते.. शे.का. पक्षाच्या अनेक नेत्यांप्रमाणे गणपतरावही आमच्या घरी घेत. एक अत्यंत निर्मळ मनाचा माणूस. व्यक्तिगत कोणतीही अपेक्षा न करता लोकांच्या प्रश्नांसंबधी
त्यांनी अखंड काळजी व चिंतन केले. माझ्या पु.लो.द.च्या मंत्रिमंडळात त्यांना घेण्याचे ठरल्यावर ते म्हणाले, मला मंत्रिपद देऊ नका, शे. का.प. ची ताकद असलेल्या रायगडच्या दि.बा. पाटील यांना मंत्रिपद द्या. अशी त्यांची निरपेक्षता होती.
ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेला जगण्याचा कायदेशीर हक्क मिळावा, म्हणून सरकारने रोजगार हमी योजना आणली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.
आम्ही त्यांना विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात पणन व रोजगार हमी मंत्री केले. हे खाते त्यांनी घ्यावे यासाठी आम्हाला त्यांची समजूत घालावी लागली. आज रोजगार हमी योजना देशपातळीवर स्वीकारलेली आहे. त्याचे मूळ सूत्र हे महाराष्ट्रात आणि सोलापूर जिल्हात आहे.
गणपतराव देशमुख यांच्यासारखा स्वच्छ, चारित्र्यसंपन्न असा नेता मिळणे हे महाराष्ट्राचे भाग्यच आहे. व्यक्तिगत सलोखा त्यांनी कधीही सोडला नाही. गणपतराव देशमुख हे सांगोला व सोलापूर जिल्हापुरते मर्यादित नाहीत, तर संपर्ण महाराष्ट्रातील कष्टकरी, दुष्काळी जनतेचे ते नेते होते.
त्यांच्यासारखा व्रतस्थ राजकारणी पुन्हा होणे नाही. त्यांच्या कार्याचे स्मरण या ग्रंथातून कायम राहील. त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आदराने सन्मानाने आणि श्रध्देने आठवणरूपी लेखन या ग्रंथात केले आहे. तो महाराष्ट्राच्या राजकारणासंबंधी महत्त्वाचा दस्तऐवज होईल.
शरद पवार
कार्यक्रमाचे स्थळ: हर्षदा लॉन्स, सांगोला । वेळ : दुपारी १.३० वाजता. रविवार दि.२०/०८/२०२३


0 Comments