google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात घडला धक्कादायक प्रकार ; भाविकांकडून तीव्र नाराजी दाेन हजार रुपयांत विठ्ठलाचे झटपट दर्शन? भाविकांसह एजंट चाैकशीच्या फे-यात

Breaking News

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात घडला धक्कादायक प्रकार ; भाविकांकडून तीव्र नाराजी दाेन हजार रुपयांत विठ्ठलाचे झटपट दर्शन? भाविकांसह एजंट चाैकशीच्या फे-यात

 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात घडला धक्कादायक प्रकार ;


भाविकांकडून तीव्र नाराजी दाेन हजार रुपयांत विठ्ठलाचे झटपट दर्शन? भाविकांसह एजंट चाैकशीच्या फे-यात

 पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन मिळावे यासाठी भाविकांकडून पैसे घेण्याचा प्रकार आज बुधवार दि.२ ऑगस्ट रोजी उघडकीस आला आहे. याबाबत दाेघांची कसून चाैकशी सुरु आहे. चाैकशीअंती दाेषी आढळल्यास दाेघांवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी माहिती दिली. 

अधिक मास निमित्ताने पंढरपूरात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच झालेल्या कमला एकादशी निमित्त जवळपास अडीच लाखाहून अधिक भाविक शनिवारी पंढरीत दाखल झाले हाेते.

दरम्यान श्री विठ्ठल दर्शनास भाविकांकडून पैसे घेऊन सोडण्याचे रॅकेट आज समोर आले आहे. हैद्राबाद मधील तीन भाविक दर्शनास आल्यानंतर त्यांना गाठून दाेन जणांनी (एजंट) प्रत्येकी दोन हजार रुपयांची मागणी करून विठ्ठल दर्शनास सोडण्याचा प्रयत्न केला.


भाविकांना विठ्ठलाचे दर्शनास सोडत असताना भाविकांची चौकशी केली असता याबाबतचा प्रकार उघडकीस आला. या दाेन्ही एजंटांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या चौकशी नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

दरम्यान मंदिर समितीमधील या पेड दर्शन साखळीत कोण काेण सहभागी आहेत यांचा शोध घेणे गरजेचे आहे. 

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेक वर्षांपासून खाजगी एजंट द्वारे पैसे घेऊन व्हीं आय पी, दर्शन सुरू असल्याची माहिती सूत्रांनुसार मिळते. यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती मधील कर्मचारी सहभागी असल्याशिवाय असे प्रकार घडणे शक्य नाही, असे मत स्थानिक व्यापारातून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments