google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळे येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी भारत इमडे तर उपाध्यक्षपदी दत्ता सरगर यांची निवड...

Breaking News

कोळे येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी भारत इमडे तर उपाध्यक्षपदी दत्ता सरगर यांची निवड...

 कोळे येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी भारत इमडे


तर उपाध्यक्षपदी दत्ता सरगर यांची निवड...

कोळे / (वाहिद आतार शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

गाव पातळीवर छोटया छोटया कारणावरुन निर्माण होणा-या तंटयांचे पर्यावसन मोठया तंट्यात होऊ न देणे, तसेच वादामध्ये मालमत्ता अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होऊ न देणे व कुटुंबाची,समाजाची व गावाची शांतता धोक्यात येवू नये यासाठी तंटे निर्माण होणार नाहीत 

व अस्तित्वातील तंटे लोकसहभागाने,सामोपचाराने व आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेवून सोडविण्याची व्यवस्था निर्माण होण्यासाठी शासन 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरु करीत आहे.

               प्रतिबंधात्मक उपाययोजना. दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे 18 3/32 सदर मोहीमेचे तीन भाग असून या तीनही भागातील कार्यवाही व तंटे मिटविण्याची मोहीम ही लोकचळवळ म्हणून राबविली यावी 

आणि त्या माध्यमातून गावे तंटामुक्त व्हावीत यासाठी मोहीम राबविल्यानंतर गाव तंटामुक्त झाल्यास अशा तंटामुक्त गावांना समारंभपूर्वक पुरस्काराने सन्मानित करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. 

                 कोळे ता.सांगोला येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती या पदावर अध्यक्ष पदी भारत इमडे तर उपाध्यक्षपदी दत्ता सरगर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या वेळी नवीन व मावळे तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. 

व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सदर यावेळी ग्रामविकास अधिकारी खटकाळे,कोळे सरपंच डे.सरपंच व ग्रामपंचायत  सर्व सदस्य व कर्मचारी कोळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा गांधी तंटामुक्ती समितीमध्ये माजी अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे योग्यरीत्या न्याय व शांतता राहील अशी योग्य भूमिका घेऊन सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीन...

कोळे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष:-भारत इमडे 

गावातील एकही तंटा पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन येथे जाऊ देणार नाही गावामधील शांतता व सोय व्यवस्था राखून योग्य प्रकारे न्याय द्यायचा प्रयत्न करीन.

कोळे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष :- दत्ता सरगर

Post a Comment

0 Comments