google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ... प्रेम विवाहात अडथळा नको म्हणून मुलीनेच दिली वडिलांचे पाय तोडण्याची सुपारी सोलापूर जिल्ह्यातील घटना..

Breaking News

खळबळजनक ... प्रेम विवाहात अडथळा नको म्हणून मुलीनेच दिली वडिलांचे पाय तोडण्याची सुपारी सोलापूर जिल्ह्यातील घटना..

खळबळजनक ... प्रेम विवाहात अडथळा नको म्हणून मुलीनेच दिली


वडिलांचे पाय तोडण्याची सुपारी सोलापूर जिल्ह्यातील घटना..

प्रेम विवाहाला अडथळा नको म्हणून लाडक्या लेकीनेच वडिलांचे पाय तोडण्यासाठी सुपारी दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यावेळी झालेल्या मारहाणीत वडील गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मुलगी तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन मारहाण करणाऱ्या चौघांना अटक केली आहे.

सोलापूर : प्रेम विवाहाला वडील विरोध करतील म्हणून मुलीने बापाचा काटा काढण्याच कट रचला. तिने चौघांना प्रत्येकी 15 हजार रुपये असे 60 हजार रुपये दिले होते. वडिलांचे पाय तोडा असे सांगितले होते. 

माढा पोलिसांनी सखोल तपास करत मुलगी तिचा प्रियकर व मारहाण करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. माढा तालुक्यातील वडाची वाडी येथे ही घटना घडली. मुलीनेच बापाची सुपारी दिल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

माढा तालुक्यातील प्रसिद्ध महेंद्र शाह असे जखमी वडिलांचे नाव आहे, तर साक्षी शाह व तिचा प्रियकर चैतन्य अशी दोघांची नावे आहेत. शाह या प्रसिद्ध व्यापाऱ्यास जबर मारहाण करण्यात आल्याने पोलिसांनी कसून तपास केला. 

माढा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नोंदीनुसार मुलीने बापास प्रियकराच्या मदतीने मारहाण केल्याची बाब नोंद झाली आहे. पळून जाऊन लग्न करण्यास विरोध होईल. वडिलांचे पाय तोडले तर त्यांचा अडथळा येणार नाही, म्हणून प्रेयसीने हा भयंकर कट रचला. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे.

पोलिसांनी मुलगी साक्षी व तिचा प्रियकर आणि त्याचे चार साथीदार अशा एकूण सहा जणांना ताब्यात घेतले आहे. साक्षी शाह ही पुण्याला गेली होती. सोमवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास शिवशाही एसटी बसने शेटफळ ता. माढा येथे ती आली.

 तेथून तिला आणण्यासाठी वडील महेंद्र शाह कार घेऊन गेले होते. शेटफळ ते वडाचीवाडी दरम्यान मुलगी साक्षीने बाथरूमला जायचे आहे असे निमित्त सांगून वडिलांना गाडी थांबवण्यास सांगितले.

मागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी मुलीदेखत महेंद्र शाह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा मारला. ते रक्तबंबाळ झाले. तेव्हा मारेकरी पसार झाले. 

शाह यांनी आरडाओरडा केल्याने वडाचीवाडीचे उपसरपंच बापू काळे व रामचरण डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महेंद्र शाह यांस ताबडतोब उपचारासाठी हलवले. या प्रकरणी पाच जणांवर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

वडिलांना मारण्यासाठी साक्षीने चौघांना पैसे दिले होते. या कटात प्रियकर चैतन्य देखील सहभागी होता. शेटफळहून माढ्याकडे वडिलांसोबत जात असताना साक्षीने चैतन्यशी ठरल्यानुसार कृती केली. प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर साक्षीने पोलिसांना चुकीची माहिती सांगितली होती. 

पोलिसांना विसंगती दिसून आली. त्यामुळे त्यांचा संशय बळावला आणि त्यांनी सखोल तपास केला. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एका बरोबर तिचे प्रेमसंबंध होते. त्यातून तिने हे कृत्य केल्याचे समोर आले.

Post a Comment

0 Comments