google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भारत राष्ट्र समिती कडून सांगोला तालुक्यामध्ये सभासद व गाव भेट दौरा चालू. येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावरती लढवू.(बी आर एस) नेते रणसिंह देशमुख यांचे विरोधकांना तगडे आव्हान.

Breaking News

भारत राष्ट्र समिती कडून सांगोला तालुक्यामध्ये सभासद व गाव भेट दौरा चालू. येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावरती लढवू.(बी आर एस) नेते रणसिंह देशमुख यांचे विरोधकांना तगडे आव्हान.

 भारत राष्ट्र समिती कडून सांगोला तालुक्यामध्ये सभासद व गाव भेट दौरा चालू.





येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावरती लढवू.(बी आर एस) नेते रणसिंह देशमुख यांचे विरोधकांना तगडे आव्हान.

भारत राष्ट्र समितीकडून सांगोला तालुक्यामध्ये सभासद व गाव भेट दौरा चालू करण्यात आला आहे.या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांचा बुलंद आवाज असणारे शिवाजी नांदखिले, बी आर एस नेते रणसिंह देशमुख, तालुका समन्वयक आप्पासाहेब वाघमारे, बाळासाहेब वाळके, व कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात भारत राष्ट्र समिती या पक्षाला पाठिंबा

 हा जोरात असून शेतकऱ्यांसाठी ऊसाला दर 3500 हजार रुपये मिळावा व तसेच सरसकट कर्जमुक्ती मिळावी. व महाराष्ट्र शासनाने वीज बिल माफ करावे तसेच कांद्यावरील 40 टक्के निर्याती शुल्क मागे घ्यावे. अश्या प्रमुख मागण्या आहेत. 

गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व शेतकऱ्यांनी या सरकारच्या गलिच्छ धोरणाबद्दल निषेध व्यक्त केलाआहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या पाठीशी आहोत आपण निवडणूक लढवावी व शेतकऱ्यांसाठी  जी आपली ध्येय धोरणे आहेत ते अमलात आणावीत असे शेतकऱ्यांकडून म्हटले जात आहे. 

त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका भारत राष्ट्र समितीला लढवण्यास सोप्या जाणार असून येणाऱ्या काळामध्ये सांगोला तालुक्यामध्ये भारत राष्ट्र समितीचे गुलाबी वादळ असेल असा इशारा भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते रणसिंह देशमुख यांनी विरोधकांना दिला आहे.

Post a Comment

0 Comments