पालकांनी मुलांसोबत संवाद साधने आवश्यक आहे.. कवी सुनिल जवंजाळ
कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पालक सभा संपन्न..
कोळा :-( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
मोबाईलच्या अतीवापरामुळे मुलांमध्ये अनेक बदल घडत आहेत हेच त्याच्या मानसिकतेस हानिकारक आहेत तर पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईलचा वापर कमी करुन त्याच्याशी संवाद साधने आवश्यक आहे
त्यामुळे चालू पिढी मोबाईलच्या अति वापरातून बाहेर पडेल, असे वक्तव्य सांगोला तालुक्यातील कोळा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी - पालक सभेवेळी कवी सुनिल जवंजाळ सर यांनी केले.
प्रथम कै. बापूसाहेब झपके यांच्या तेलचित्रास पुष्पहार प्रमुख पाहुणे कवी सुनिल जवंजाळ सर , प्राचार्य श्रीकांत लांडगे सर, विनोद देशमुख सर, पर्यवेक्षक र. ज. मनेरी सर, जे. पी. माने सर, व पालकांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आला.
पुढे कवी जंवजाळ सर बोलताना म्हणाले तंत्रज्ञानाच्या तफावती भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे याचबरोबर मुलांचा मोबाईल बंद करणे व व्यवहारीक शिक्षण दिले पाहिजे, मुलांसोबत खेळणे महत्त्वाचे आहे
यामुळे मुलांच्या मानसिकतेमध्ये भरपूर बदल घडून येईल याचबरोबर दररोज मुलांसोबत जेवण करणे दररोज बोलणे व विचाराची देवाण घेणे करणे तसेच मुलांचा कल पाहून शिक्षण देणे अभ्यासाचा ताण देऊ नये आदीबाबत पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी बाह्यपरीक्षा मधील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार पालकांसह प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला.
प्राचार्य विनोद देशमुख सर आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले या शाळेत पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेतला आहे आपल्या मुलांचे भाग्य उज्ज्वल नक्की होणार त्याचबरोबर पालकांच्या अडीअडचणी बाबत पालकांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास पालक बहूसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती काटे मॅडम यांनी केले तर आभार तांबोळी मॅडम यांनी केले कार्यक्रम पार पडण्यासाठी विभाग प्रमुख कुलकर्णी मॅडम यांच्या सह विद्यामंदिर परिवार मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी :- कोळा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल कोळा गुणवंत विद्यार्थी यांचा पालकांसह सत्कार करताना कवी सुनिल जंवजाळ सर, प्राचार्य श्रीकांत लांडगे सर, मुख्याध्यापक विनोद देशमुख सर.


0 Comments