खळबळजनक...सर्पदंशाने तडफडणाऱ्या चिमुकल्याचा उपचारा अभावी मृत्यू...
सांगोला तालुक्यातील कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ढिसाळ नियोजनामुळे धक्कादायक घटना घडली
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
सांगोला :-कोळे येथे अचानक सर्पदंश झाल्याने पाचवर्षीय बालकाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोळे (ता. सांगोला) येथे घडली आहे. गावात प्राथमिक केंद्र असूनही वेळेत उपचार न मिळाल्याने बालकाला जीव गमवावा लागल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
स्वराज सोपान आलदर (वय ८) असे मृत बालकाचे नाव आहे. स्वराज आलदर या पाच वर्षाच्या मुलास सिद्धनाथ नगर येथे सर्पदंश झाला होता. साधारणपणे ९.४५ च्या दरम्यान ही घटना घडली आहे.
शुक्रवारी रात्री १०.०० पर्यंत त्याला दवाखान्यात पोहचण्यात आले. परंतु, तेथे फक्त एक नर्स व शिपाई उपस्थित होते.नेमणूक केलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहत नसल्यामुळे दुर्दैवी घटना घडली वेळीच प्राथमिक उपचार मिळाले असते तर त्या लहान मुलाचे प्राण वाचू शकले असते, असे नातेवाईकांचे मत आहे.
कोळा हे प्राथमिक आरोग्य केंद्र सांगोला तालुक्यातील काही मोठ्या आरोग्य केंद्रापैकी एक असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविकासाठी राहण्याची व्यवस्था ही अतिशय धोकादायक असल्याने आरोग्य सेविका राहू शकत नाहीत. आरोग्य सेविक कोळ्यासारख्या परिसरात राहण्यास अनुच्छक असतात. गेले अनेक वर्ष
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायकवाड कोळा प्राथमिक आरोग्य केंद्र मुक्कामी राहून सेवा चांगली देत होते त्यांचे कौतुकही होत होते परंतु त्यांची बदली झाल्याने आरोग्य केंद्राचं ढिसाळ नियोजन दिसून येत आहे सध्याचे वैद्यकीय अधिकारी मुक्कामी राहत नाहीत रुग्णांच्या वारंवारी तक्रारी ऐकायला मिळतात नेहमी कामाकडे दुर्लक्ष करतात असे लोक सांगतात •यामुळे गैरसोय झाल्याने अशा घटना घडल्या आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्याकडून नेहमी दुर्लक्ष केले जात आहे. एवढ्या मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी मुक्कामी नसणे डॉक्टर नसणे हीच खरी माणुसकीला लाजीरवाणी गोष्ट आहे. असलीच व्यवस्था राहिली तर अशा किती स्वराज आलदर चे तुम्ही बळी घ्याल. कोण कोणत्या व्यवस्थेवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल कराल? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करून गलथान कारभार करणाऱ्या डॉक्टरांवर व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे.
कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ढिसाळ कारभार दिसून स्वराज आलदर याला सर्पदंश झाल्यानंतर त्याचे वडील दवाखान्यात घेऊन गेले नर्स व शिपाई उपस्थित होते वैद्यकीय अधिकारी नसल्याने प्राथमिक वैद्यकीय उपचार केले नसल्याने मिरज येथे हलवण्यात आले वाटेतच त्याचा मृत्यू झाला संबंधितावर कठोर कारवाई व्हावी अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.
आनंदा आलदर सिद्धनाथ नगर कोळा


0 Comments