अखेर शहीद अशोक कामटे संघटनेच्या पाठपुराव्याला यश
कलबुर्गी -कोल्हापूर रेल्वेस सांगोला थांबा मंजूर
सांगोला (प्रतिनिधी) शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज
रेल्वे क्रमांक 22155 & 22156 कलबुर्गी -कोल्हापूर- कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेस सांगोला थांबा मंजूर केल्याचे पत्र सोलापूर रेल्वे विभागाचे वाणिज्य व्यवस्थापक एस व्ही देशपांडे यांनी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेस कळविले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कलबुर्गी -कोल्हापूर- कलबुर्गी या एक्सप्रेस गाडीस सांगोल्यात थांबा नव्हता आणि प्रवाशांची मागणी व गैरसोय लक्षात घेता शहीद कामटे संघटनेने वेळोवेळी निवेदने, स्मरणपत्रे, आंदोलने ,निषेध मोर्चा रेल्वे प्रशासनावर काढला होता,
त्या अनुषंगाने सदरचा थांबा अधिक गरजेचे असल्याचे रेल्वे प्रशासनास निदर्शनास आणून दिले होते त्याचबरोबर सांगोला शहर व तालुक्यातील सुमारे 10 ते 15 हजार सर्वसामान्य नागरिकांचे मागणी पत्र पोस्ट कार्डद्वारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवण्यात आले होते.
याचीच दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने येथील सर्वेक्षण करून शहीद अशोक कामटे संघटनेच्या मागणीची दखल घेऊन सदरचा थांबा मंजूर करण्यात आला. सदर थांबा मंजुरीचे पत्र मिळाल्यानंतर शहीद कामटे संघटनेने रेल्वेच्या सर्वच विभागात चौकशी केली
असता येथील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून याची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निळकंठ शिंदे सर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सदरचा थांबा मिळवण्याकरता सांगोला शहरातील सर्वच नागरिक, स्वयंसेवी संस्था यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाल्याचे शिंदे सर यांनी सांगितले.
चौकट:-
दोन वर्षात फक्त सांगोला थांब्यालाच मंजुरी
सोलापूर रेल्वे विभागाकडे गेल्या दोन वर्षात विविध ठिकाणी रेल्वेना थांबा मिळावा याकरिता अनेक निवेदने आलेली आहेत ती अजूनहि मंजुरीचे प्रतीक्षेत आहे पण केवळ शहीद अशोक कामटे संघटनेने सांगोला थांब्याचे मागणी पत्र, निवेदन आमच्या दिल्ली रेल्वे बोर्ड यांनी सर्व सकारात्मक गोष्टी विचारात घेता मंजूर केले आहे.
आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून या गाडीचे ऑनलाइन सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये सांगोला स्थानक समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे .लवकरच येथील वेळापत्रक जाहीर करून प्रवाशांची गैरसोय दूर करू.
ताजुद्दीन ,विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांचे स्वीय सहाय्यक.




0 Comments