google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात आबासाहेबांचे सर्वच क्षेत्रात मोठे योगदान - नितीन वाघमोडे

Breaking News

सांगोला तालुक्यात आबासाहेबांचे सर्वच क्षेत्रात मोठे योगदान - नितीन वाघमोडे

सांगोला तालुक्यात आबासाहेबांचे


सर्वच क्षेत्रात मोठे योगदान - नितीन वाघमोडे

सांगोला आबासाहेबांनी दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय योजना कशा करता येतील यावर सरकारला सूचना दिल्या. आबासाहेब दीर्घकाळ विरोधी बाकावर असताना देखील त्यांनी सरकारला सूचना दिल्या तसेच प्रशंसा देखील केली आहे.आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व सामान्यलोकांना न्याय दिला.

 विधिमंडळातील त्यांची सखोल आणि अभ्यासपूर्ण भाषणे गाजली आहेत. आबासाहेबांचे सर्वच क्षेत्रात मोठे योगदान आहे असे मत आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांनी व्यक्त केले.

भाई जगन्नाथराव लिगाडे (तात्या) चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सूत गिरणीचे माजी चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे लिखित 'आठवणीतील भाई गणपतराव देशमुख' स्मृतीग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आयकर आयुक्त नितीन वाघमोडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती रतनबाई देशमुख उपस्थित होत्या. 

यावेळी आयुक्त नितीन वाघमोडे, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव जे. जी. जाधव, प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के, पोपटराव देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, सूत गिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, 

प्रा. शिवाजीराव काळूंगे, प्रा. पी. सी. झपके खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष इंजि.रमेश जाधव, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण पाटील, के. एस. माळी, प्रभाकर चांदणे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सचिन देशमुख, 

मारुती बनकर, बाळासाहेब एरंडे, डॉ. श्रीकांत भोसेकर, शहाजी नलवडे, अरविंद केदार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजित घुले यांनी केले.

प्रा. डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले, आबासाहेब सत्वशील चारित्र्याचे होते. हा ग्रंथ आठवणींचा असल्याने याचे महत्त्व अधिक आहे. खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पन्नालाल सुराणा, बाबा आढाव, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, वैभव नायकवडी, 

ना. धो. महानोर, आ. ह. साळुंखे, मधुकर भावे यांच्यासह ३५ लोकांचे मनोगत या ग्रंथात आहे. आबासाहेबांचा नाही तर खोकेवाल्यांच्या विचारांचा प्रसार करायचा काय...? महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील हुकूमशाही प्रवृत्ती उध्वस्त करायची असेल तर गणपतराव देशमुख यांच्या मार्गाचा, विचारांचा अवलंब करावा लागेल असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक करताना प्रा. नानासाहेब लिगाडे म्हणाले, जीवनाचे मूल्यमापन व्हावे यासाठी या स्मृती ग्रंथाचे लिखाण केले आहे. या स्मृतीग्रंथाला खा. शरद पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. हा स्मृतीग्रंथ वाचकांच्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे.

 आबासाहेबांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. आबासाहेबांच्या इच्छेखातर मी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं असल्याचे सांगताना प्रा. नानासाहेब लिगाडे यांना गहिवरून आले. आभार प्रा. राजेंद्र सूर्यवंशी यांनी मानले.

शाळांच्या ग्रंथालयात देणार मोफत स्मृतिग्रंथ -

आठवणीतील भाई गणपतराव देशमुख हा स्मृतिग्रंथ सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील सर्वच शाळांमधील ग्रंथालयात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सिताराम महाराज साखर कारखान्याच्या कार्यकारी संचलिका डॉ. राजलक्ष्मी गायकवाड यांनी स्वीकारली आहे.

Post a Comment

0 Comments