धक्कादायक प्रकार...चोराला पोलीस सामील
असल्यामुळेच गुन्हेगारीत होतेय वाढ " नागरिकातून चर्चा
सांगोला /( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज): सांगोला तालुक्यामध्ये भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन या चोरांना पोलिस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथे दर अमावास्येला महाराष्ट्र राज्यातून भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याच गर्दीचा फायदा घेऊन एका वीस ते बावीस वर्षाच्या तरुणाने दहा ते पंधरा जणांच्या खिशावर डल्ला मारून हजारो रुपये व महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट चोरले तसेच देव दर्शनासाठी आलेल्या
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून घेतले यावेळी चोरी करताना. चोरास नागरिकांनी पकडून चांगलाच चोप देऊन त्यास म्हसोबा देवस्थानचे व्यवस्थापक आबा माने यांच्या ताब्यात दिले त्यांनी सदर चोराला पकडून गावच्या पोलीस पाटलांच्या ताब्यात देऊन पोलीस पाटलांनी त्या गुन्हेगारास कटफळ बीट हवलदार वाघमोडे यांना
त्वरीत संपर्क साधून त्यांना म्हसोबा देवस्थान येथे बोलावून घेऊन त्या चोराला ताब्यात दिले. चोराला पोलीस घेऊनही गेले आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार कुणीही दिली नाही या कारणाने पोलीसांनी गुन्हेगारास पोलीसी खाक्या न दाखविता आर्थिक वाटाघाटी करून सोडून दिले असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे .
सांगोला तालुक्यातील पोलीसानी आपले काम चोख बजावले परंतु लोटेवाडी गावातील प्रसिद्ध म्हसोबा देवस्थानच्या देवदर्शनासाठी आलेले भाविक भक्त धोंडीराम सुखदेव काकेकर राहणार गणेशवाडी तालुका मंगळवेढा विलास बिरा हाके राहणार महाळुंग तालुका माळशिरस भगवान शिवाजी कोकरे राहणार बचेरी तालुका माळशिरस समाधान लेगरे रा वाकी शिवणे तालुका
सांगोला अनिल जगन्नाथ पवार राहणार फळवणी तालुका माळशिरस संजय भारत मोरे राहणार जैनवाडी तालुका पंढरपूर यांचे पाकीट चोरले तसेच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने महिलांनी व नागरिकांनी खिशाला लागलेल्या कात्रीबाबत न्याय कुणाकडे मागायचा ?
असा प्रश्न उपस्थित केला जात आहे चोरी करीत असताना त्या चोराला पकडून पोलीसांनी नागरिकांचा जबाब नोंदवून पाकिट मार चोराला बेडया ठोकून गुन्हेगाराला आळा घालता आला असता उलट पोलीसांनी चोराबरोबर हातमिळवणी करून सोडून दिले असल्याची चर्चा तालुका भर रंगु लागली आहे.
दर अमावास्येला या गावांमध्ये भर दिवसा चोरीचे प्रकार घडत असुन चोरांना पकडून देऊन देखील पोलिस कांहीही कारवाई करीत नसल्यानेच चोर आणि पोलीस यांचे आर्थिक हितसंबंध आहेत की काय ?
अशी चर्चा होऊ लागलेली आहे दिवसा ढवळ्या चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य शासन द्यावे तसेच गुन्हेगाराबरोबर आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या पोलीसावर कारवाई करण्याची मागणी भाविक भक्तातून केली जात आहे .


0 Comments