महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे शिष्ट मंडळ देशाचे नेते
तेलंगणा चे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली
महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे शिष्ट मंडळ देशाचे नेते तेलंगणा चे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली
व निवेदन दिले धनगर समाजाला गेली 70 वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवलेले प्रस्थापित पक्षांनी धनगर समाजाचा मतदानापुर ताचा उपयोग करून घेतला राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना या सर्व पक्षांना धनगर समाजाने भरघोस मतदान केले
परंतु या प्रस्थापित पक्षांनी धनगर समाजाची घोर निराशा केली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये 36 क्रमांकाच्या कलम मध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिलेले आहे
परंतु या जातीयवादी पक्षांनी धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले हैदराबाद या ठिकाणी महाराष्ट्रातील शिष्ट मंडळ गेले असता तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांनी शिष्टमंडळाला शब्द दिला की महाराष्ट्र राज्यामध्ये भारत राष्ट्र समितीचे सरकार आल्यास पहिल्याच
कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल असा शब्द त्यांनी दिला यावेळी महाराष्ट्राचे धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब सुपनवर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक ह भ प श्री हनुमंत महाराज पावणे
महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष श्री दादासाहेब खामगळ समता परिषदेचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष श्री रामदास बनकर महाराष्ट्र राज्य धनगर समाजामध्ये मंडळाचे सचिव श्री युवराज खरात कल्याण कोपनवर राजेंद्र कारंडे आजिनाथ इरकर शिवाजी बनकर नवनाथ कोळेकर दादासाहेब महानवरआदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments