मोठी बातमी..शरद पवारांनी टाकला भलताच डाव, PM मोदींना चॅलेंज अन् अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम?
मुंबई: INDIA आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक पार पडणार आहे. याच बैठकीच्या निमित्ताने आज (30 ऑगस्ट) एक पत्रकार परिषद पार पडली. ज्याला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, अशोक चव्हाण हे नेते हजर होते.
यावेळी या सर्वच नेत्यांनी भाजपच्या हुकूमशाही विरोधात आपण एकत्र आल्याचा दावा केला. पण याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एक असा डाव टाकला की, ज्यामुळे अजित पवार खूपच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेत शरद पवार यांना अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत गेले यावरून जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी एक मोठं विधान केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच चॅलेंजही दिलं.'मी पंतप्रधान मोदींचं भोपाळचं भाषण ऐकलं..
भोपाळच्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर टीका केली.. राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन घोटाळा या दोन गोष्टी त्यांनी आवर्जून सांगितल्या.'माझा आग्रह एकच आहे
पंतप्रधानांजवळ की, ते पंतप्रधान आहेत देशाचे. जिथे सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजासमोर करावी. फक्त आरोप करण्यात अर्थ नाही. तुमच्या हातात सत्ता आहे. त्याची चौकशी करा.. आणि संबंध देशाला सांगा वस्तुस्थिती काय आहे.'
असं म्हणत शरद पवार यांनी एकाच वेळी पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांना खिंडित गाठण्याचा प्रयत्न केला आहे. जागा वाटपावर देखील शरद पवारांचं मोठं विधान 'आम्ही जागा वाटपाची चर्चा सुरू केलेली नाही. आमच्या पहिल्या ज्या दोन बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या.
उद्या इथून पुढचा आपला सामूहिक कार्यक्रम काय असावा याच्यासंबंधीची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेच्या मध्ये जर असा निर्णय झाला तर काही लोकांवर ही जबाबदारी टाकली जाईल. की, तुम्ही अन्य राजकीय पक्षाशी डायलॉग साधा. यातून आपण एकत्र जाऊ शकतो का?
यासंबंधीचा अभ्यास करा.'वेगवेगळे पक्ष आहेत ही गोष्ट खरी आहे. पण बसून किमान समान कार्यक्रम ठरवून आम्ही तयार करू शकतो. याआधारेच आपणच पुढे जाऊ शकतो.' असं मोठं विधान शरद पवारांनी यावेळी केलं आहे.
0 Comments