धक्कादायक ... हार्डवेअर दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
पिंपरी चिंचवडमधील पूर्णानगर भागातील हार्डवेअरच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
चिमणाराम बेणाराम चौधरी (वय ४८), नम्रता चिमणाराम चौधरी (वय ४०), भावेश चिमणाराम चौधरी (वय १५), सचिन चिमणाराम चौधरी (वय १३) अशी मृतांची नावे आहेत.
सचिन हार्डवेअर या दुकानात चौधरी कुटुंब रहात होते. शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
दुर्घटनेचे वृत्त समजताच आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी लगेचच घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला तसेच त्यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
घटनास्थळी पोलीस उप आयुक्त डॉ.काकासाहेब डोळे,क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे,सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात,मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे,उदय वानखेडे,
जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वरिष्ठ पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर काटकर,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,अग्निशमन विभागाचे जवान,सुरक्षारक्षक उपस्थित होते.
आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून पोलीस, महापालिका आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
0 Comments