google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रा. अंजली जाधव यांना “राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण सन्मान” २०२३ पुरस्कार जाहीर

Breaking News

प्रा. अंजली जाधव यांना “राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण सन्मान” २०२३ पुरस्कार जाहीर

 प्रा. अंजली जाधव यांना “राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण सन्मान” २०२३ पुरस्कार जाहीर 


  

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क संपादक संतोष साठे )

शिरभावी  :-     प्रा.अंजली जाधव यांना “राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण सन्मान” २०२३ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे . हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 शिक्षक दिन व डॉ. राधाकृष्णन जन्मदिना निमित्त गोवा हिंदी अकादमी, गोवा व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र  यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण संमेलन कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. 

या संमेलनात देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय संमेलनात देण्यात येणारा यावर्षीचा “राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण सन्मान” २०२३ पुरस्कार प्रा. अंजली जाधव यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे .

 गोवा हिंदी अकादमी, गोवा व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र यांच्या निवड समितीने प्रा. अंजली जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. प्रा. अंजली  जाधव यांचे शिक्षण B.A.B.ed, M.A.M.ed, SET in Hindi, इतके झाले असून सध्या त्या सोलापूर विदयापीठामध्ये Ph.D. करत आहेत. 

त्यांचा Ph.D. चा विषय तृतीय पंथी लोकांच्या जीवनाशी संबंधित असल्याने त्यांनी संशोधनासाठी बऱ्याच तृतीयपंथी लोकांच्या भेटी घेतल्या त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मायेची उभारी दिली. समाजाने तृतीयपंथी लोकांना घृणास्पद वागणूक देवू नये म्हणून त्या प्रयत्न करत आहेत. 

साहित्य लेखनातून तृतीयपंथी लोकांचे दु:ख, वेदना मांडून  त्यांच्याविषयी सकारात्मक दृष्टिकोण निर्माण करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या कविता वास्तविक असून काळजामध्ये घर करणाऱ्या आणि माणसाला विचार करायला लावणाऱ्या आहेत . मुक्ति (स्त्री मुक्ति  आधुनिक संदर्भ)

 या काव्यसंग्राहासाठी त्यांची वेशा  हया कवितेची निवड झाली आहे . तर ‘बेनाम चिट्टीयाँ  काव्यसंग्राहासाठी  ‘बेटियों की सिसकीयाँ’ या कवितेची निवड झाली आहे. त्या सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका असून त्या समाजसेवेचे कार्य करतात. 

त्या रोज 6pm से 7. Pm. एक तास गरीब विद्यार्थ्यांना मोफत ज्ञानदान करतात. या अभ्यासाबरोबर रांगोळी, चित्रकला, शुद्धलेखन, नृत्य याचे ज्ञान देतात. त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरस्कार, Indien Talent Award, The super Women Award, Mother Teresa memorial Award, 

संत संत कबीर सेवा रत्न अवार्ड, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श साहित्यिक पुरस्कार असे काही पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तसेच त्यांनी ‘बालगुन्हेगारांवरती संशोधन’ केले आहे. त्यांच्या संपर्कात असणाऱ्या पालकांच्या व विदयार्थ्यांचे त्या समुपदेशन करतात. 

त्यांचा ‘पाककला’ हा कोर्सही झाल्याने त्या महिलांना घरगुती लघुउ‌द्योगाचे ज्ञान देतात. मागील काही दिवसांपूर्वीच त्यांना सहारा चारिटेबल ट्रस्ट या संस्थेचा National Ideal Teacher Award 2023 ( राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार ) जाहीर झालेला आहे.  

 शिक्षक दिन व डॉ. राधाकृष्णन जन्मदिना निमित्त गोवा हिंदी अकादमी, गोवा व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र  यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण संमेलन कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण संमेलनाचे उद्घाटन मा. धनंजय महाडिक ( राज्यसभा खासदार, कोल्हापूर ) यांच्या हस्ते होणार आहे.

 तसेच संमेलनाध्यक्ष मा. डॉ. हणमंत अशोक शिरगुप्पे ( संस्थापक अध्यक्ष / चेअरमन अनुराधा अर्बन निधी बँक, गडहिंग्लज ) हे असणार आहेत. मा. शंभू भाऊ बांदेकर ( माजी उपसभापती, गोवा विधानसभा ), मा. श्री. वैभव नाईक ( विधानसभा सदस्य, सिंधुदुर्ग ),

 मा. डॉ. उत्तम सकट ( उप कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ ), मा. यशवंत मानखेडकर ( माजी उपसंचालक, नेहरू युवा केंद्र ),  मा. डॉ. सौ. रजनीताई मुरलीधर शिंदे ( संस्थापक अध्यक्षा वैध फाउंडेशन, इचलकरंजी ), मा. सुर्यकांत सावंत ( उद्योजक, कणकवली ) हे प्रमुख पाहुणे या संमेलनाला लाभणार आहेत. 

या राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्र भूषण संमेलनात शिक्षक दिन व डॉ. राधाकृष्णन जन्मदिना निमित्त विविध कार्याच्या गौरवार्थ व अन्य क्षेत्रात निःस्वार्थपणे कार्य कर्तृत्व घडवून समाज घटकांना एकत्र आणणाऱ्या व्यक्ती व सेवाभावी संस्थांचा  वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.  

या राष्ट्रीय संमेलनात देण्यात येणाऱ्या “राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण सन्मान” २०२३ पुरस्कारासाठी  प्रा. अंजली  जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे ही खरोखरच खूप अभिमानाची व  कौतुकास्पद बाब आहे . 

       प्रा. अंजली जाधव यांची कामगिरी पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड  केली आहे .  या पुरस्काराचे स्वरूप  सन्मानचिन्ह,  गौरवपत्र,  फेटा, श्रीफळ असे आहे.  सदर पुरस्कार वितरण सोहळा  वार रविवार दि. 3 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वा.  छत्रपती शाहू महाराज स्मारक, 

दसरा चौक, कोल्हापूर, महाराष्ट्र  या ठिकाणी पार पडणार आहे . प्रा. अंजली जाधव यांना “राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण सन्मान” २०२३ हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे व त्यांच्या वरती अभिनंदनाचा  वर्षाव केला जात आहे .

Post a Comment

0 Comments