ब्रेकिंग न्यूज.. पतीने कारभारात लुडबुड केल्यास महिलेच सरपंचपद रद्द होणार!
गावात जर महिला सरपंचाच्या कामात त्यांच्या पतीने हस्तक्षेप केल्यास थेट संबंधित संरपंचाचे पदच रद्द होऊ शकते. त्यामुळे आता तरी सावध व्हा, नाहीतर हा प्रकार अंगलट येऊ शकतो.
याबाबत एखादी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली तर त्यांच्या अहवालानुसार विभागीय आयुक्त सरपंचाचे पद रद्द करू शकतात, असा इशाराच छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत यांनी दिला आहे.
ज्याठिकाणी ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच आहेत, अशा ठिकाणी त्यांचे पती किंवा इतर नातेवाईकांनी संरपंचांच्या खुर्चीत बसल्यास, त्यांच्या कामात हस्तक्षेप केल्यास किंवा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यास त्यांच्या विरोधात मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.
महिला सरपंचांच्या कामांत नातेवाईकांचा वाढता हस्तक्षेप थांबवण्यासाठी 2007 मध्येच राज्य शासनाने निर्णय जाहीर केला होता.
0 Comments