सांगोला तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळेतील शिक्षकांकडून घेतल्या जातात लाखोंच्या वर्गणी
बेकायदेशीर वर्गणी घेणाऱ्या संस्थेवर शिक्षण विभाग कारवाई करणार का?
सांगोला प्रतिनिधी,( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सांगोला तालुक्यातील घेरडी, सोनंद, कडलास, जवळा आदि केंद्रातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांकडून संस्थापक दरवर्षी लाखो रुपयांच्या वर्गणी बेकायदेशीर आणि जुलमी पद्धतीने वसूल करीत आहेत.जे शिक्षक अशा वर्गणी देण्यास नकार देतात, अशा शिक्षकांना मानसिक त्रास संस्थेतील संचालक मीटिंग घेवून देतात.
शिक्षकाना विद्यार्थ्यांसमोरच पैशाचे काय झाले असे अडवून विचारत असल्याने अनेक शिक्षक नोकरीतून काढून टाकण्याच्या भीतीने कुठेही वाच्यता करीत नाहीत. सांगोला तालुक्यातील अशा संस्थेवर शिक्षण विभाग काय कारवाई करणार की मूग गिळून गप्प बसणार हे पहावे लागणार आहे.
बेकायदेशीर वर्गणी वसूल करणाऱ्या अशा संस्थेवर बंदी घालण्याची मागणी दबक्या आवाजात जोर धरू लागली आहे.शैक्षणीक संघटनांना हा विषय माध्यमिक शिक्षकानी या पूर्वी तक्रारी स्वरूपात सांगितला आहे, पण शैक्षनिक संघटना ही गप्प आहेत.या विषयी आवाज उठविण्याचे धाडस या संघटना करणार का?
हे येणाऱ्या काळात पहावे लागणार आहे. अशा संस्थेतील संस्थापक मुख्याध्यापकाला हाताशी धरून शालेय पोषण आहारात लाखोंचा अपहार करीत आहेत. याची चौकशी करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.
सांगोला तालुक्यातील शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या अशा संस्थेची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा माध्यमिक शिक्षण विभाग, आणि संबंधित शाळेच्या गेटवर हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.
0 Comments