शिरभावीचे प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय गुरुवंदना जीवनगौरव
सन्मान” २०२३ पुरस्कार जाहीर शिरभावीच्या शिरपेचात मानाचा तुरा
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)
शिरभावी :- सांगोला तालुक्यातील शिरभावी गावचे युवक सुपुत्र व श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय गुरुवंदना जीवनगौरव सन्मान” २०२३ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे . हा पुरस्कार जाहीर झाल्याने श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाच्या व शिरभावी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिक्षक दिन व डॉ. राधाकृष्णन जन्मदिना निमित्त गोवा हिंदी अकादमी, गोवा व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण संमेलन कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्य व इतर क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय संमेलनात देण्यात येणारा यावर्षीचा “राष्ट्रीय गुरुवंदना जीवनगौरव सन्मान” २०२३ पुरस्कार प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे .
गोवा हिंदी अकादमी, गोवा व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र यांच्या निवड समितीने प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. शैक्षणिक,सामाजिक, राजकीय, साहित्य व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल
अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठित समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती मा. प्रा.डॉ.बी. एन.खरात ( अध्यक्ष, विद्यार्थी विकास अकादमी, सिंधुदुर्ग ) व मा. सुनिल शेट ( अध्यक्ष, गोवा हिंदी अकादमी, गोवा राज्य ) यांच्या कडून पत्राद्वारे देण्यात आली आहे .
शिक्षक दिन व डॉ. राधाकृष्णन जन्मदिना निमित्त गोवा हिंदी अकादमी, गोवा व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण संमेलन कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्रभूषण संमेलनाचे उद्घाटन मा. धनंजय महाडिक ( राज्यसभा खासदार, कोल्हापूर ) यांच्या हस्ते होणार आहे. तसेच संमेलनाध्यक्ष मा. डॉ. हणमंत अशोक शिरगुप्पे
( संस्थापक अध्यक्ष / चेअरमन अनुराधा अर्बन निधी बँक, गडहिंग्लज ) हे असणार आहेत. मा. शंभू भाऊ बांदेकर ( माजी उपसभापती, गोवा विधानसभा ), मा. श्री. वैभव नाईक ( विधानसभा सदस्य, सिंधुदुर्ग ), मा. डॉ. उत्तम सकट ( उप कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ ),
मा. यशवंत मानखेडकर ( माजी उपसंचालक, नेहरू युवा केंद्र ), मा. डॉ. सौ. रजनीताई मुरलीधर शिंदे ( संस्थापक अध्यक्षा वैध फाउंडेशन, इचलकरंजी ), मा. सुर्यकांत सावंत ( उद्योजक, कणकवली ) हे प्रमुख पाहुणे या संमेलनाला लाभणार आहेत.
या राष्ट्रीय गुरुवंदना राष्ट्र भूषण संमेलनात शिक्षक दिन व डॉ. राधाकृष्णन जन्मदिना निमित्त विविध कार्याच्या गौरवार्थ व अन्य क्षेत्रात निःस्वार्थपणे कार्य कर्तृत्व घडवून समाज घटकांना एकत्र आणणाऱ्या व्यक्ती व सेवाभावी संस्थांचा वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या राष्ट्रीय संमेलनात देण्यात येणाऱ्या “राष्ट्रीय गुरुवंदना जीवनगौरव सन्मान” २०२३ पुरस्कारासाठी प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे ही खरोखरच खूप अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे .
त्यांना या राष्ट्रीय संमेलनात मा. प्रकाश वेळीप ( माजी शिक्षणमंत्री, कृषीमंत्री, पंचायत मंत्री, गोवा सरकार ), मा. श्री. अनिल मोरे ( सिने अभिनेते, तथा, मा. सहसचिव ग्रामविकास मंत्रालय, म.रा. मुंबई )यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व इतर क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे . या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, गौरवपत्र, मेडल, फेटा,श्रीफळ असे आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा वार रविवार दि. 3 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वा. छत्रपती शाहू महाराज स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर, महाराष्ट्र या ठिकाणी पार पडणार आहे .
अशी माहिती मा. प्रा.डॉ.बी. एन.खरात ( अध्यक्ष, विद्यार्थी विकास अकादमी, सिंधुदुर्ग ) यांच्याकडून देण्यात आली आहे. प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय गुरुवंदना जीवनगौरव सन्मान” २०२३ हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे व त्यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे .
0 Comments